चंद्रकांत मांढरे, सुलोचना, जयश्री गडकर, सुलोचना, राजशेखर, चंद्रकांत गोखले यांसारख्या कलाकारांची फौज, सोबतच आनंदघन यांचे सुरेल संगीत आणि “ऐरणीच्या देवा” सारखे सदाबहार अजरामर गाणे हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. खेडयातून शहरात आलेले एक कुटुंब आणि त्यांचा दैनंदिन जीवनक्रम या चित्रपटातून मांडला आहे. तर साध्या आणि भोळ्या-भाबड्या लोकांची केली जाणारी पिळवणूक, स्त्रीयांवर वाईट नजर, तिच्या पतीला होणारा त्रास हा विषय “साधी माणसं” मधून उत्तमरित्या भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनातून साकार झाला आहे. या चित्रपटाला राज्य शासनाच्या उत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.
चला तर मग पाहूया, १९६५ साली प्रदर्शित झालेला साधी माणसं हा चित्रपट..
—
Leave a Reply