मित्रहो,
जन्माला आला हैला अन पाणी भरता भरता मेला. ही प्रसिध्द म्हण सध्याच्या युवा पिढीला तंतोतंत लागू पडते.मानवी जीवन म्हणजे काय तर अपेक्षा,अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न त्यातून झालेली अपेक्षापूर्ती किंवा अपेक्षाभंग.
आजच्या तरुणांना या अपेक्षेच्या ओझ्याखालीच वावरावे लागते.कुटुंबाच्या अपेक्षा,मित्रांच्या अपेक्षा,समाजाच्या अपेक्षा अन यात नवीन भर पडली आहे ती सरकारच्या अपेक्षांची.या ओझ्याखाली दबून जीव अगदी नकोसा झालेले कित्येक तरुण/तरुणी आपल्या आसपास दिसतात.किंबहुना त्यांच्यापैकी एक आपणही असतो.
पण काही जन या अपेक्षांच्या प्रेशरखाली दबून सुध्दा अधिक जोमाने काम करतात.रोजच्या व्यवहारातले पनीरचे उदाहरण घ्या ना.प्रचंड दाब दिल्यानंतर ते एकसंध होते.बाजारात चढ्या भावाने विकले जाते.असेच रोजच्या जीवनातील अनुभवातून रोज काही न काही शिकले पाहिजे. आपली मार्केट व्हॅल्यू आपल्यातील सुप्त गुणांचा विकास करुन वाढविले पाहिजे.कोणी किलोभर कांदे घेऊन श्रीमंत होत नसतो.हे कळाले तरी पुष्कळ आहे.
तेव्हा ओझ्याच्या प्रेशर कुकरला घाबरु नका.होऊ द्या पाहिजे तेवढ्या शिट्या.तेव्हाच तर तुमची डाळ शिजेल..
Leave a Reply