खेडोपाडी पसरलेल्या मराठी वाचकांची वाचनाची भूक लहानमोठी वाचनालये भागवित असतात. ही ग्रंथालये चालविणार्या कार्यकर्त्यांना ती कमी श्रमात अधिक चांगली चालविता यावी. शासनाच्या नियमांनुसार त्यांची कार्यवाही असावी. सर्व शासकीय योजना-माहितीचा लाभ घेऊन आपल्या ग्रंथालयांची स्थिती त्यांना अधिक चांगली करता यावी. याकरिता लागणारी सर्व ताजी माहिती एकत्र नीट वर्गीकृत स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा व त्यातून ग्रंथालय चळवळीला हातभार लावणारे सार्वजनिक ग्रंथालय मार्गदर्शक. पृ.112 किं.200 रू.कोणत्याही क्षेत्रात मुलभूत माहिती ही प्रगतीचा प्राण असते. त्यामुळे अन्य क्षेत्राप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातही संबंधित सर्व कार्यकर्त्यांना उपयुक्त माहिती सहज व सुलभतेने उपलब्ध व्हावी. त्यातून त्यांच्या संस्थेची प्रगती व्हावी, या साठी सार्वजनिक ग्रंथालय मार्गदर्शक हे पुस्तक नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
या पुस्तकांच्या वापरामुळे ज्या कार्यकर्त्यांना/संस्थांना ग्रंथालय सुरू करायचे आहे, त्यांनाही मार्गदर्शन व्हावे. तसेच जी ग्रंथालये सुरू आहेत त्यांना शासकीय मान्यता, अनुदान, वर्गबदल या दृष्टीनेही मार्गदर्शन व्हावे, या दोन्ही दृष्टीने या पुस्तकांचे संकलन-संपादन केले आहे. या 112 पानी पुस्तकात सर्व माहिती विषयवार संग्रहित आहे.
सार्वजनिक कार्यकर्त्यांची शक्ती, व वेळ वाचावा, सार्वजनिक ग्रंथालयांची स्थिती अधिक चांगली व्हावी. आणि परिणामी त्या त्या भागात लहानमोठ्या सर्व प्रकारच्या वाचकांच्या पुस्तकांची गरज प्रभावी रीत्या व अधिक चांगली पूर्ण व्हावी, ही अपेक्षा व आशा या उपक्रमामागे आहे.
हे पुस्तक सार्वजनिक ग्रंथालयाच्या कार्यकर्त्यांना/पदाधिकार्यांना संपूर्ण मार्गदर्शन करणारे आहे. सार्वजनिक ग्रंथालयांसाठी आणि ग्रंथालय विभागासाठी अशा दोन विभागातून या पुस्तकात माहिती संग्रहित करण्यात आली आहे. ग्रंथालय सुरू करायचे असेल किंवा विद्यमान ग्रंथालयांना वर्गबदल करायचा असेल, विशिष्ट अनुदान मिळवायचे असेल, या सर्व विषयांवर यात अद्ययावत माहिती व मार्गदर्शन आहे. ग्रंथालयांना लाभणारे विविध प्रकारचे फॉर्मेटस्चे तक्ते, शासनाला पाठवायच्या माहितीचे तक्ते आदि सर्वांचे नमुनेही यात दिले आहेत. सर्व प्रकारची माहिती सहज हाताशी असल्यामुळे सार्वजनिक ग्रंथालयांचे काम खूप सोपे व सहज झाले आहे.
या पुस्तकांची किंमत 200/- रु. आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क, नचिकेत प्रकाशन 24, योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015. पाने : ११२ किंमत : २०० रु. (: 0712- 6536653, 6535167, टेलीफॅक्स:- 2285473 मो. 9225210130
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply