कोणते दुःख तुला छळते
अकारण तूं कां व्यथित होते ।।धृ।।
प्रेमळ छत्र पित्याचे असतां
गेले जीवन तुझे बागडतां
लाड पुरविले आईने तव
शिकवित असतां आनंदी भाव
आठव सारे ह्यांच क्षणी ते ।।१।।
अकारण तूं कां व्यथित होते
बांधून घेतां राखी हातीं
आश्वासन ते तुजला मिळती
पाठीराखा भाऊ असूनी
येईल तो तुजसाठीं धावूनी
मग कां तव मन संकोचते ।।२।।
अकारण तूं कां व्यथित होते
संसार भरला सुख-दुःखानी
घे शिरावर तुझाच समजूनी
जीवनमार्गी होता बदल
नको होऊस तूं वेडे चंचल
सावध असूं दे चित्त तुझे ते ।।३।।
अकारण तूं कां व्यथित होते
नाते गोते वाढवित जावे
सर्वामध्यें प्रेमळ व्हावे
छत्राखालतीं होती आजवर
छत्रचि बनावे तूं इतःपर
संस्काराचे मधूर फळ येते ।।४।।
अकारण तूं कां व्यथित होते
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***२५
एकसष्टीनंतर जीवनातील प्रमुख बाबींची प्रश्नावली मुलांच्या हाती द्यावी
ती कशी सोडवतात, त्याकडे सजगतेने नजर ठेवावी
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply