साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 संपादकाच्या नजरेतून वाचकांसाठी…
आमचा साहित्य उपेक्षिताचे दीपावली विशेषांक 2015 अवघ्या 52 पृष्ठांचा आहे. त्या 52 पृष्ठात आंम्ही सर्व वसाहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 संपादकाच्या नजरेतून वाचकांसाठी…
आमचा साहित्य उपेक्षिताचे दीपावली विशेषांक 2015 अवघ्या 52 पृष्ठांचा आहे. त्या 52 पृष्ठात आंम्ही सर्व वयोगटातील वाचकांचा त्यांच्या आवडीचा विचार करुन साहित्याची निवड केलेली आहे.
आमच्या दीपावली विशेषांक 2015 च्या मुखपृष्ठावर डॉ.शांताराम कारंडे यांचे छायाचित्र आहे ते पाह्ताच वाचकांच्या भुवया उंचावतील विशेषता स्त्री वाचकांच्या कारण दीपावली विशेषांक म्ह्टला की त्यावर सुंदर दिसणार्याभ स्त्रियांचे छायाचित्र पाह्ण्याची आमच्या वाचकांना सवयच जडलेय ! असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. डॉ.शांताराम कारंडे हे एक उत्तम साहित्यिक आहेत त्यासोबत साहित्यिकांचे सच्चे मित्रही आहेत. मला व्यक्तीशः नेहमी वाटायचं की दीपावली विशेषांकाच्या मुखपृष्ठावर साहित्यिकांचे छायाचित्र का नसतात ? कदाचित ते दिसायला सुंदर नसतात हे कारण असेलही. पण डॉ.शांताराम कारंडे त्याला अपवाद आहेत हे मी खात्रीने सांगू शकतो. कदाचित दीवाळी अंकांच्या संपादकाना लेखकांच्या चेह्र्याआतील सौंदर्य कधी दिसलेच नसावे. डॉ.शांताराम कारंडे आमचे मित्र, मार्गदर्शक आणि प्रसंगी गुरु असले तरी आमच्या दीपावली विशेषांकाच्या मुखपृष्ठावर त्यांचे छायाचित्र असावे ही कल्पना माझ्याच सुपिक डोक्यातून बाहेर आली होती. कारण मला व्यक्तीशः कोणत्याही मासिकांच्या मुखपृष्ठांवर साहित्यिकांची छायाचित्रे पाहायला आवडेल कारण त्यामुळे सामान्य वाचकही लेखकांना चेहर्यापने ओळखू लागतील.
आमच्या दीपावली विशेषांकाची सुरुवात माझी संपादकीय सोडली तर डॉ.शांताराम कारंडे यांच्या मॅरेथॉन मुलाखतीने झालेय पण माझ्या एका पत्रकार मित्राने ती मुलाखत मॅरेथॉन कशी नाही हे मला पटवून देण्याचा प्रयत्न केला जो योग्यही होता. पण मी साहित्याची निर्मिती अतीशय सामान्य वाचकांसाठी करतो हे ही त्याला मान्य करावे लागेल. मला लेखकांचा लेखक व्हायचं नाही तर मला सामान्य वाचकांचा लेखक व्हायचंय. आमचा दीपावली विशेषांक सामन्य वाचकालाही वाचायला आवडेल याची आंम्हाला खात्री आहे.
आमच्या दीपावली विशेषांकात डॉ.शांताराम कारंडे यांची ‘आत्मह्त्या’, अशोक कुमावत यांची ‘वनदेवीची कृपा’, वर्षा किडे – कुळकर्णी यांची ‘मनिनी’ आणि माझी ‘एक रुपया’ हया चार कथा वाचकांना काहीतरी संदेश देताना दिसतील याची आंम्हाला खात्री आहे. डॉ.शांताराम कारंडे यांचे लेख वाचकांना मार्गदर्शन करतील तर सहभागी कविंच्या कविता वाचकांच्या मनावर हळुवार फुंकर घालतील. जयेश मेस्त्री यांची ‘टर्निंग पॉईंट’ ही एकांकीका फक्त तरुणांनीच वाचावी अशी आमची अपेक्षा आहे.
आमचा हा साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 लहान मुलांपासून जेष्ठांपर्यत सर्व वाचकांचा विचार करून तयार केलेला आहे. विकत घेऊन वाचलात तर आनंद आहे आणि नाही वाचलात तरी तो आपल्या पर्यंत मोफत पोहचविण्याची आमची तयारी आहे कारण वाचनसंस्कृती जपणे हेच आमचे स्वप्न आहे….
Leave a Reply