व्हॉटसऍपवरुन फिरणारी ही कविता सीकेपी समाजाच्या नात्यांच्या गुंतागुंतीवर मस्त प्रकाश टाकतेय.. कवी कोण आहे ते माहित नाही…
ईकडुन नाते , तिकडुन नाते ,
बर्याच ठीकाणी साटे लोटे|
CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !
ताम्हणे,नागले , सुळे ,बेंद्रे,
काही देखणे, काही शेम्बडे |
मुली मात्र सुंदर सुडौल ,
CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !
कालची भाची, आजची सुन,
भाचाच आणला जावई म्हणुन |
हलका फुलका घरचा माहौल ,
CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !
चिटणीस,फडणिस , हझरनविस,
चांगल्यास चांगले , वाईटास खविस |
परखड वृत्ती, तिरकस बोल ,
CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !
रविवारी मटण, सोमवारी बिरढे !
कघी निनावे कौतुकाचे !
सोड्याची खिचङी, बोंबलाची भजी !
खाजाचे कानवले, कालवण झिंगय़ाचे !
मेजवानीची खासियत अनमोल !
CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !
काश्मिरातूनी उगम पाविले!
दक्षिण देशी रथापित झाले!
बाजीप्रभ् ते अमर जाहले !
गडकरी नाट्यामधूनि स्मरिले !
सी डी देशमुख गौरवस्थानी !
बाळासाहेब महाराष्ट्र अभिमानी !
शौर्याला बुद्धिमत्तेचा तोल!
CKP न्ची दुनियाच गोल,
नेहेमी असतो नात्यांचा झोल !
Leave a Reply