नवीन लेखन...

सी.ई.ओ: भूमिका आणि जबाबदारी

नागरी बॅंका/पतसंस्था किंवा कोणत्याही संस्थेतील सी.ई.ओ.- मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे व्यवस्थापनातील वजिराचे प्यादे असते. सी.ई.ओ ची भूमिका यशस्वीरीत्या निभावणे म्हणजे तारेवरची कसरत असते. ही भूमिका त्याला प्रभावी रीत्या निभाविता यावी, यासाठी त्याची नेमकी जबाबदारी काय? भूमिका कार्य? मर्यादा काय? यांचे सांगोपांग विवेचन व मार्गदर्शन शाखा व्यवस्थापन या लोकप्रिय व दुसरी आवृत्ती निघालेल्या पुस्तकाचे लेखक व नागरी बॅंकांचा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉ. माधव गोगटेे यांनी या पुस्तकातून केले आहे. आजच्या व उद्याच्याही प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकार्‍याने वाचावे, अभ्यासावे, असे हे संग्राह्य पुस्तक आहे. नचिकेत प्रकाशनांची नेहमीप्रमाणे दर्जेदार निर्मिती आहे. डॉ. माधव गोगटे पृ. 144 किं. 250 रू. ISBN : 978-93-80232-01-0 नागरी बॅंका, नागरी पतसंस्था व कर्मचारी पतसंस्था यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी कसा असावा? त्याची भूमिका व जबाबदारी स्पष्ट करण्यासाठी डॉ. माधव गोगटे यांचे हे पुस्तक आजच्या आणि उद्याच्याही अर्थात सी.ई.ओ. होऊ इच्छिणार्‍या प्रत्येक अधिकार्‍यासाठी अत्यावश्यक असेे पुस्तक आहे. सी.ई.ओ. च्या मार्फत संस्थेत उत्तम काम करून घेण्याकरिता सीईओचे पद समजून घेण्यासाठी वरील संस्थाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांनीही हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. शाखा व्यवस्थापन या द्वितीय आवृत्ती निघालेल्या पुस्तकाचे लेखक डॉ. माधव गोगटे यांनीच अतिशय कळकळीने व सांगोपाग पद्धतीने यात संपूर्ण विषय ठेवले आहेत.

या पुस्तकात पुढील विषय सविस्तर आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी : एक प्रकट चिंतन पोटनियम व मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे काम व जबाबदार्‍या यांचे विश्र्लेषण मुख्य कार्यकारी अधिकारीआणि विविध सभा संबंधितासोबत संवाद मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे जातक.

नचिकेत प्रकाशन नागपूर ने ही दोन सर्वांग सुंदर व परिपूर्ण पुस्तके प्रकाशित करून आपली उज्वल परंपरा अधिकच वाढवली आहे. प्रकाशकाचे अभिनंदन नचिकेत प्रकाशन : 24,योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440015 पाने : १४४ किंमत : २५० रु.

— मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..