सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।। सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।। कंठी झळके माळ मुक्ता फळाची जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।। चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।। हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।। रुणझुणती नुपुरे चरणी
घागरीया ।। जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। २ ।। लंबोदर पितांबर फणिवर वंधना ।। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।। दास रामाचा वाट पाहे सदना ।। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।। जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। ३ ।।
— रामदास स्वामी
Leave a Reply