खाली दिलेल्या छोट्या-छोट्या उपायांमुळे आपले आरोग्य संतुलित राखण्यास मदत होईल, तसेच वजनही आटोक्यात राखता येईल.
१.दही- रोजच्या आहारात वापरल्या जाण्याऱ्या दह्यामध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणावर आढळून येते यामध्ये असणारे कॅल्शिअम फॅट्स वाढवणारे हार्मोन्स संतुलित ठेवते त्यामुळे सुटलेल्या पोटावर नियंत्रण आणण्यासाठी ‘दही’ हा उत्तम उपाय आहे.
२. टॉमेटो- टॉमेटोचे सूप किंवा सॅलेड सुटलेले पोट नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. टॉमेटोमध्ये फॅट्स कमी करणारे घटक मोठ्या प्रमाणावर असतात.
३. बडीशेप- जेवणानंतर रोज एक चमचा बडीशेप खाणे फायद्याचे ठरते. बडीशेपेमध्ये फायबर, आयर्न, मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात असते त्याचा उपयोग पचनशक्ती वाढवण्यास होतो.
४. सोयाबिन- आपल्या आहारामध्ये सोयाबिनचा वापर करणे उपयुक्त असते सोयाबिनमध्ये असणारे घटकांमुळे अतिरीक्त भूक नियंत्रणात येते.
५. लसूण- रोज सकाळी 4-5 कच्च्या लसणीच्या पाकळ्या खाव्यात त्यावर एक ग्लास पाणी प्यावे यामुळे शरीरातील फॅट्स बर्न होण्यास मदत होते.
६. मासे- मासे खाल्याने शरीररातीलातील फॅट्स कमी होतात असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही परंतू हे खरे आहे माशांमध्ये ओमेगा 3 आणि प्रोटीन असते त्यामुळे भूक संतुलित राखण्यास मदत होते. माशांचा उपयोग आठवड्यातून एकदा आहारात नक्की करावा.
७. काकडी- रोज जेवणाआधी आहारामध्ये काकडीचा सामावेश करावा काकडीमध्ये फायबर, मिनरल, व्हीटॉमिन आणि पाणी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शरीरांतील टॉक्सिन्स् बाहेर पडायला मदत होते.
८. अननस- अननसामध्ये अत्यंत गुणकारी घटक असतात अननसातील या घटकांमध्ये पोट कमी होण्यास मदत होते.
९. दूध- एका सर्वेक्षणानुसार असे आढळून येते की दूधामधील कॅल्शिअम शरीरातील फॅट्स कमी करण्यास उपयुक्त ठरते त्यामुळे रोज रात्री एक ग्लास दूध पिणे फायद्याचे ठरते.
१०. अळशी- अळशी ह्या घटकामध्ये आयर्न तसेच ओमेगा 3 आढऴून येते अळशी खाल्ल्यामुळे पोट कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर मधूमेह, अल्जायमर आणि कॅन्सरचा होण्याचा धोकाही कमी होतो. रोज एक चमचा अळशी किंवा अळशीची चटणी खाणे फायद्याचे ठरते.
— आरोग्यदूत या Whatsapp ग्रुपवरुन साभार
Leave a Reply