कोकणातून आला फळांचा राजा
खातांना वाटते फारच माते
केशरी-पिवळा रस काढला, लहान-थोरांना खुप आवडला
काटेरी हिरवा फणस पण आणला, खसाखसा त्याला कापून काढला
सोनेरी खजिना आता सापडला
सार्यांनी खाऊन फस्त केला
कोकण चा मेवा छान छान छान
सार्यांनी खाल्ला विसरुन भान
ऊन्हाळ्याच्या सुट्टीत मामा कडे जाऊ
गोड गोड मेवा रोज रोज खाऊ
जळ्यात, मळ्यात, खळ्यात गुंगु
आजीच्या गोष्टी ऐकण्यात रंगू.
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply