प्रगती झाली, विकास झाला, सुधारणाही सुधारणा,संभ्रम परि मना, सुधारणा की, स्वत:शीच ही प्रतारणा ।।१।।
वायुवेगाने प्रवास घडे, जगाचे अंतर झाले कमीवाहने वाढली, अपघात वाढले, राहिली जीविताची ना हमी ।।२।।
औषधोपचार वाढले, तसे वाढले रोग आजारसुखसोयी वाढल्या, परंतु स्वास्थ्य पळाले दूरची फार ।।३।।
दूरध्वनी, भ्रमणध्वनी कानाशी, संगणक झाला सखापत्र हरवले, माणूस झाला सुसंवादास पारखा ।।४।।
माणूस चंद्रावरी पोहोचला, गरुडझेप विज्ञानाचीपण शेजारी कोण राहतो? खबर नसे याला त्याची ।।५।।
इमले-बंगले उंच वाढले इमारती भिडती गगनालापरंतु आमची मने खुजटली, माणुसकी मिळते मातीला ।।६।।
घरे सजली-नटली परंतु मने सार्यांची दुभंगलीअत्मकेंद्रित झाला मानव नाती-गोती अंतरली ।।७।।
स्वार्थ, वासनापूर्तिस्तव जगी दुराचार वाढलेपाहुनी क्रूर, दुर्वर्तन मानवी, पशुही लज्जित झाले ।।८।।
मंदीरांत गर्दी भक्तांची, मिठाई पेढ्यांची खैरातचतकोराला महाग झाला, लाचार उपाशी कुणी दारांत ।।९।।
शिक्षणाचा बाजार झाला, नोटांवरी तोलती पात्रतागरीब, गरजू दूर राहतो, पदरी निराशा, उदासिनता ।।१०।।
शिक्षणाचे ओझे वाढले, रुजले ताण तणाव मनात खोलआत्महत्या वाढत गेल्या, जीवन वाटे कवडी मोल ।।११।।
पती-पत्नी दोघेही मिळवती, आवक वाढली पैशांचीवृद्धाश्रम, पाळणाघरे वाढली चलती झाली हो त्यांची ।।१२।।
वंचित वात्सल्यास बालके, वृद्धांच्या पाणी डोळ्यांना फुलण्याआधी कोमेजती कळ्या, कोण पुसेवठल्या खोडांना ।।१३।।
धनवंतांच्या गाड्या धावती, जीव घेण्या बेधुंदीतपैशाचा धुर धनिकांच्या डोळा, पाणी निष्पापांचे डोळ्यात ।।१४।।
स्वस्ताई होती, पगारही कमी, परि होतो संतुष्ट आम्ही पगार वाढला, गरजाहि वाढल्या, तरिही अजुनी बेचैन आम्ही ।।१५।।
सर्व सुखे पायाशी असुनही, हाव
तयांची अधिक सुटेपरंतु मनाला शांती, मिळेना अजुनी शोधतो कुठे कुठे ।।१६।।
— किशोर रामचंद्र करवडे
Leave a Reply