टिंब टिंब बँकेत किव्वा कोणत्याही सरकारी नोकरीसाठी क्लार्कची भरती किव्वा इतर भरतीसाठी परीक्षा फी रुपये टिंब टिंब (नक्कीच रुपये ३०० पेक्षा जास्त) अशी जाहिरात तरुण मंडळी नेहमी बघतात.
पण खरोखर एवढा खर्च येतो का परीक्षेला?
मग का एवढी मागणी केली जाते. कित्येक मुले असे असतात कि फी भरून सुद्धा परीक्षेसाठी बोलावले जात नाही. बिचारा तो तरुण काटकसर करून परीक्षा फी भरतो. आणि बऱ्याच वेळेला प्रवास खर्च सुद्धा या तरुण मुलांना दिला जात नाही. बिचारे हे तरुण स्वतः खर्च करून परीक्षेला जातात.
आता बघा एकतर सरकारी नोकरीसाठी वयाची अट असते १८-३० वर्ष, जी मुले १८-२४ वर्ष गटातील असतात ते मास्टर डिग्री घेत असतात त्यामुळे ती डिग्री घेता घेता हि मंडळी स्पर्धा परीक्षा सुद्धा देतात त्यामुळे यांचा खर्च पालकांनाच करावा लागतो आणि दर वेळेला पालकांना परवडणार आहे का हा खर्च.
बऱ्याच वेळेला परीक्षा फीचा खर्च हा ५०० रुपये पेक्षा सुद्धा जास्त असतो.
का एवढी मागणी केली जाते हे मला काही उमजलेल नाही. पूर्वी जास्तीत जास्त फक्त रुपये १५०/- मागणी केली जायची पण आज डबल नाही तर …….. मागणी केली जाते आणि ती का ?
— सचिन सदावर्ते
Leave a Reply