“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे….
तेच सदैव नेटबिझी असे…..
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे नसे….
तेच सदैव अनेक कामात बिझी असे….
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे….
सदैव खाली मान घालुन बसे….
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे नसे….
तेच ताठ मानेने जगासमोर बसे….
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे….
रात्रभर Whatts Appas व फेसबुकवर असे…
“स्मार्टफोन” ज्याच्याकडे नसे…
तो प्रातःकाळी ऊठुन दिनचर्येस प्रारंभ करे…
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे….
कामात त्यांचे सतत लक्ष नसे….
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे नसे…
तेच प्रमोशन घेण्यास पात्र असे….
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे….
ते परिवारापासुन लांब वसे….
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे नसे….
ते परिवारात सदैव मग्न असे….
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे….
ते सुखदुःखात लांबुन सहभागी होत असे…
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे नसे…
ते वैयक्तिक भेटुन धीर देत असे….
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे…
सणावारांचे भावपुर्ण मेसेज सेंन्ड करण्यात व्यस्त असे…..
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे नसे….
ते पारंपारिक पध्दतीने एकत्रितपणे सणवार परिवारासोबत साजरे करण्यात व्यस्त असे..
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे…
तो सदैव एकांतात असे..
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे नसे….
तो सदैव मित्रपरिवारात असे….
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे असे….
तो सदैव अस्थिर व चंचल असे..
“स्मार्टफोन” ज्याच्यांकडे नसे…
तो सदैव स्थिर.. एकाग्र..एकचित्तच असे….
— विवेक जोशी
Leave a Reply