अजुनही स्रियांना घरात समान वागणुक मिळत नाही.नवर्यासाठी rule वेगळे आणि बायको साठी वेगळे. पुर्वी पेक्षा अजुन वाईट परीस्थिती आहे आता.पुर्वी कामांची विभागणी तरी होती की बायकांनी घर ,मूल सांभालावे आणि पुरुषाने कमवुन आणावे.आता बायको कमवते पण आणि घर पण साभांळते. ही झाली आधुनिकता. पण बायको जर पुरुषाचे कमवान्याचे काम करु शकते , तर मग घरकामाच्या वेळेस कसा काय पुरुषांचा ,सासरच्यांचा अहंकार जागा होतो, आपली संस्कृती आठवते.
नवरा बायको दोघ जेव्हा कामावरुन परत येतात तेव्हा,नवरा TV बघत बसतो, आणि तीने माञ त्याला तिथे चहा ,पाणि आणुन दयावे आणि स्वयंपाकाला लागावे. का अस काम करुन फक्त नवराच दमातो का, आणि बायको ति नाही का दमत.एवढ़ करुनही काही कामात चुक झाल्यास सगळे तयारच असतात नाव ठेवायला. तीला तीच स्वताच आयुष्य तर राहात नाहीच पण ना १००% घराला,मुलांना देता येता ना नोकरी ला म्हणजे ती सगळी कड़े inefficeint ठरते.
सासु सासर्यांना तिने आई वड़ील ,नणंदेला बहिण मानुन त्यांचे करावे अशी अपेक्षा असते पण तीलाही मुलगी मानुन तिच्याशी वागाव अस नाही वाटत.तिने फक्त सगळयांच्या ईच्छा पुर्ण कराव्या तिला माञ काही दुखत खुपत असेल तिलाहि काही ईच्छा असतील हे कोणाच्या गाविही नसते कींवा समजुन ऊमजुन दुर्लक्ष केले जाते.कमीत कमी तिला माणुस म्हणुन तरी वागवा.
नवर्याच्या मैञिणी चालतात तिथे ते आधुनिक विचारांचे होतात पण तिने माञ कूठल्याही पुरुषाशी बोलु ही नये.
अजुन १ सगळ्यात मोठी व्यथा म्हणजे ती pregnant असली आणि तीला जर आराम सागिंतला तर तिला माहेरी पाठवले जाते.मुलाला नाव तर नवर्याच लागत ना, मग नवर्याने सासरच्या लोकांनी का नाही करू तिची काळजी,सुश्रुषा? कधी बदलणार आहे ही मानसिकता?अजुनही बायकोकडे फक्त फुकटची मोलकरीन, ऊपभोगाची वस्तु म्हणुनच बघितल जात. बाहेर खुप आधुनिक वागणारे पूरुष घरात माञ बायकोशी वागतांना कमर्ठ होतात.
माझ अस म्हणण नाहीये की सगळे पुरुष असे आहेत.फक्त ९५% च असे आहेत.
— सोनाली
Leave a Reply