नवीन लेखन...

स्लिप डिस्क

मणक्यांभोवतीच्या पेशींना इजा होऊन त्या तुटतात तेव्हा स्लिप डिस्क हा आजार होतो. दोन मणक्यांमधील मऊ चकती हालचाल करण्यासाठी, पुढे मागे करता येण्यासाठी या पेशी मदत करत असतात. ही सरकल्यामुळे हा आजार होतो. पाठीचा मणका हा 26 हाडांनी बनलेला असतो. प्रत्येक हाडांमध्ये मऊ चकती असते. ही चकती हाडांचे रक्षण करतेच; परंतु चालताना, पळताना शरीराला बसणार्याय हादर्यांुपासून मणक्याचे रक्षण करण्याचे काम करते. ही चकती दोन भागात असते. चकतीचा आतला भाग मऊ, मांसल असतो तर बाहेरचे कवच कठीण असते. कोणताही जखम किंवा आजारपण यांमुळे चकतीचा मऊ भाग कठीण कवचाच्या बाहेर ढकलला जातो. यालाच स्लिप डिस्क म्हणतात. काही गंभीर स्थितीत स्लिप डिस्कचा इलाज करण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते.
स्लिप डिस्क होण्याची कारणे
पाठीच्या कण्यामध्ये स्लिप डिस्कचा धोका संभावतो. कधी तरी चकतीच्या बाहेरील भाग कमजोर होतो, तुटतो त्यामुळे आतील मांसल भाग बाहेर येतो. काही वेळेला चुकीच्या हालचालींमुळेही स्लिप डिस्कचा धोका संभवतो. एखादी वस्तु उचलताना, मणका फिरला किंवा ट्विस्ट होतो, कधी अतिजड वस्तू उचलल्यामुळे पाठीच्या कण्यावर ताण येतो. अशा प्रकारांमुळे स्लिप डिस्कचा त्रास होतो. कमजोर स्नायू, बैठे काम यामुळेही स्लिप डिस्क होऊ शकतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही ही समस्या भेडसावते. काही इतर गोष्टीही तुमच्या मणक्यावरील दाब वाढवतात.
* झटकन खाली वाकणे
* नोकरीत जड वस्तू उचलण्याचे काम
* गाडी चालवण्यासारखी सतत बसून करण्याची कामे
* धूम्रपान
* अतिलठ्ठ किंवा वजन जास्त असणे
* वेटलिफ्टिंग साऱखे वजन जास्त लागणारे खेळ
* गाडी अपघातात मणक्यांना होणारी दुखापत
स्लिप डिस्कची लक्षणे
* असह्य वेदना, बधीरपणा, बहुतेकदा शरीराच्या एका भागात हे त्रास जाणवतात.
* पाठीतून सुरू होणारे हे दुखणे नंतर पाय आणि हातांपर्यत येते.
* रात्रीच्या वेळी असह्य वेदना होतात
* बसताना उठताना देखील असह्य वेदना होतात.
* कमी अंतर चालून जाणे सुद्धा वेदनादायी ठरते.
* स्नायूंमध्ये कमजोरी येणे, स्लिप डिस्क झालेल्या जागी मुंग्या येणे जळणं, दुखणे,आदी लक्षणे दिसतात.
* अर्थात प्रत्येक रुग्णागणिक वेदनांचे स्वरुप बदलत जाते. जर मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवत असेल, तर वैद्यकिय मदत घेणे गरजेचे आहे.
उपचार
आजार किती बळावला आहे, त्यावर उपचारांची दिशा अवलंबून असते. मणक्याची चकती तिच्या जागेवरुन किती सरकली आहे, यावरही औषधोपचार काय करावे हे ठरते. ठराविक व्यायामाने औषधांशिवाय रुग्णांना आराम मिळतो. पाठीच्या कण्याला ताण देण्यासारखे व्यायाम पाठ आणि स्नायूंना ताकद देतात. फिजिओ़थेरिपी ने स्लिप डिस्कमध्ये फायदा होतो. त्यातील तज्ज्ञांनी सांगितलेल्या व्यायामाने तुमच्या पाठीचे स्नायू मजबूत होऊन तुमचे दुखणे कमी होईल.
स्लिप डिस्क आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गांभीर्य वाढून नसांना कायमस्वरुपाची इजा होऊ शकते. काही अपवादात्मक परिस्थितीत स्लिप डिस्कमुळे पाय किंवा पाठीच्या नसांचा आजार होतो. त्याला कॉडा इक्विना असे म्हणतात. हा त्रास उद्भवल्यास मुत्राशय किंवा आतड्यावरील नियंत्रण गमावण्याची भीती असते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. रामदास जाधव

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..