शिवछत्रपतींच्या स्वराज्यस्थापनेत कायस्थ प्रभु ज्ञातीचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेच्या कार्यात शिवाजी महाराजांना सर्वोतपरी मदत करणार्या आणी प्रसंगी बलिदान करणार्या ज्या ज्ञाती होत्या त्या मध्ये चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञाती ही अग्रस्थानी होती. शिवशाहीसाठी कायस्थ वीरांनी फार मोठे आत्मसमर्पण केले असे हिंदवी स्वराज्याचा इतिहास सांगतो. आज शिवजयंतीच्या निमित्ताने यातील काही कायस्थ वीरांची थोडक्यात माहीती.
1. शिवाजीराजांना रायरेश्वराच्या देवळात दूधभात व बेलभंडारा उचलुन हजार बाराशे मावळयांसह हिंदवी स्वराज्याची प्रेरणा व शपथ देणारे होते – दादाजी नरसप्रभु देशपांडे-कुलकर्णी गुप्ते.
2. रानोमाळी फिरुन आदिलशाहींतील हजारो सैनिकांचे आपल्या गोड वाणीने मन वळवुन मुसलमानी अधिपत्याखालील अनेक गडकरी व हत्यारबंद सैनिक शिवाजी राजांना स्वराज्याच्या कामी मिळवुन दिले ते ह पिलाजी दुर्वे व त्यांचे बंधु यमाजी मावजी प्रभु दुर्वे यांनी.
3. छत्रपतींचे सचिव व अत्यंत विश्वासु सहकारी होते बाळाजी आवजी चिटणीस. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत बाळाजींचा अत्यंत महत्वाचा वाटा होता.ते छत्रपतीचे अत्यंत एकनिष्ठ असे सेवक होते.
4. शिवाजीराजांचे अनेक गड बांधणारे दुर्गकार होते पद्मदुर्गकार मल्हारराव नारायण चौबळ (चेउलकर)
5. शिवाजी राज्यांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते विश्वासराव बाबाजी दिघे – देशपांडे. यांना अनेक भाषा अवगत होत्या.
6. छत्रपती शिवरायांचे वकील उर्फ पारसनीस होते निळकंठ उर्फ निळो येसाजी प्रभु – पारसनीस. या पारसनीसांना मराठी,हिंदी,संस्कृत,पर्शियन,उर्दु,मागधी,पाली,तेलगु,द्राविडी इतक्या भाषांचे उत्तम ज्ञान होते असे सेतुमाधवराव पगडी यांनी त्यांच्या शिवाजी या इंग्रजी पुस्तकांत लिहिले आहे.
7. छत्रपतींच्या आज्ञेवरुन कल्याणचा खजिना लुटुन महाराजांच्या चरणी अर्पण करणारे होते..कर्णिक..देशपांडे..तोरणेकर व राजमाचीकर हे सगळे कायस्थ होते.
8. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षक दलाजे प्रमुख होते गंगो भंगाजी वाकनीस – प्रधान. गंगो भंगाजी वाकनीस इतके शूर होते की,त्यांच्या या अंगरक्षक दलाची ख्याती व विशेषत: गंगो भंगाजी यांची भिती अगदी औरंगजेबालाही होती असे इतिहासात सांगितलेले आहे.
9. किल्ले रायगडचे पोतनीसी मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज पोतनीस यांच्याकडे होती.
10. दादाजी रघुनाथ प्रभु देशपांडे – महाडकर हे शूर सरदार होते व शिवाजी राजे त्यांना घेतल्याशिवाय कोणत्याही मोहिमेस जात नसत.
11. पुरंदर या महत्वाच्या किल्लयाचे किल्लेदार होते शूर वीर सरदार मुरारबाजी देशपांडे. घनघोर युध्दानंतरही मोगल सरदार दिलेरखान याला त्यांनी किल्ला दिला नाही.मुरारबाजी या लढाईत धारातिर्थी पडले पण किल्ला पडला नाही.
12. विररत्न बाजी प्रभु देशपांडे हे शिवाजी राजांचे प्रमुख सरदार होते.महाराज विशालगडाकडे जातांना मोगलांविरुध्द घोडखिंडीतील त्यांनी दिलेली पावन लढत जगभर प्रसिध्द आहे.
13. बाजीप्रभु देशपांडे – प्रधान हे जसे कसलेले योध्दे होते त्याचप्रमाणे ते एक कुशल असे स्थापत्यशास्त्रज्ञ होते हे सांगुनही कोणाला खरे वाटणार नाही.पण इतिहास सांगतो की बाजी प्रभु यांना स्वराज्याच्या 27 गडांची डागडुजी करण्याचे व पुनर्बांधणी करण्याचे अत्यंत महत्वाचे असे काम महाराजांनी त्यांना दिले होते.याचा उल्लेख बखरीत केलेला आहे.
14. शिवाजी राजांचे राज्याभिषेकाप्रसंगी 32 मणस सोन्याचे सिंहासन बनविले होते अण्णो दत्ताजी चित्रे यांनी.
असे हे महान कायस्थ वीर. या व्यतिरीक्तही अनेक कायस्थ प्रभु वीरांनी स्वराज्य स्थापनेच्या कामी महाराजांना एकनिष्ठेने मदत केली. महाराजांचा कायस्थांवर प्रचंड विश्वास होता. शिवाजी महाराजांनी आपले पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ कायस्थ ज्ञातीविषयी काढलेले गौरवोद्गार इतिहासात नोंदविलेले आहेत.महाराज म्हणत ….
“”प्रभुंची जात सदैव विश्वासपात्र जात आहे. ते विश्वासाने काम करितात.प्रसंगी आपल्या धन्यासाठी प्रभु लोक आपले प्राणही खर्ची घालण्यास मागे पुढे पहात नाहीत.”
हिंदवी स्वराज्यासाठी कायस्थांनी केलेल्या या त्यागाला स्मरुन प्रबोधनकार ठाकरे यांनी एक कवीता लिहिली होती त्यातील एक कडवे असे होते…..
राज्य मर्हाठी श्री.शिवबांचे का कायस्थांचे
कायस्थांच्या रक्तावरती बुरुज उभे त्यांचे,
ज्या राज्याची प्राणप्रतीष्ठा कायस्थे केली,
अवतारी शिवमुर्ती मग वरती स्थापन झाली…..
Leave a Reply