सृष्टीचे सर्वोच्च परम नियंत्रक भगवान श्रीकृष्णांचे पाचवे अवतार असलेले महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामींनी अहमदनगर शहरानजिकच्या भिंगारला 35 दिवस वास्तव्य केल्याच्या घटनेला अनन्यसाधारण महत्व आहे. या घटनेच्या अनुषंगाने भिंगारच्या चक्रधर स्वामी मंदीराचे प्रमुख सुदामराज बीडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी महिन्यात दरवर्षी पदस्पर्श पावनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याविषयी सुदामराज बीडकर
यांच्या (मो.9730953767) वर संपर्क साधावा. चक्रधरस्वामी पूर्वाधात शके 1192 पौष वैद्य द्वादशीला भिंगारला आले. माघशुद्ध द्वादशीपर्यंत येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यानंतर उत्तर्धात 1195 मध्ये मार्गशीर्ष वद्य द्वितीया ते मार्गशीर्ष सोमवती अमावस्येपर्यंत असे 35 दिवस चक्रधरस्वामींचे भिंगारला वास्तव्य होते. चक्रधरस्वामींचे पुण्यपद ज्या ज्या स्थानांना लाभले ती सर्व स्थाने महानुभाव पंथियांना वंदनीय ठरली. महानुभाव पंथियांचे स्थानपोथी व लिळाचरित्र हे अत्यंत श्रद्धेचे ग्रंथ आहेत. या ग्रंथात स्वामींनी ज्या गावात विहार केला त्या गावाची केला, त्या गावाची बारीक सारीक माहिती घेऊन वेचक-वेधक वर्णन करण्यात आले आहे. यात भिंगारचा उल्लेख आहे. यातील वर्णनानुसार आठशे वर्षांपूर्वी भिंगार हे लहान गाव नव्हते. स्वामींचे ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्या ठिकाणी पूर्वी आदित्याचे (सूर्यनारायण) मंदीर होते. त्या मंदीराच्या दक्षिणेकडील भिंतीला लागून पूर्व-पश्चिम ओटा होता. त्या ओट्यावर स्वामींचे बसणे, उठणे, भोजन, निरूपन आदी कार्य केेले जायचे. तेव्हापासूनचा हा ओेटा आज मुख्य पूजनीय स्थान मानले जाते. अंगणातील स्नान करण्याच्या स्थानासह पाच स्थाने पूजनीय मानली जातात. श्रीचक्रस्वामी दार्शनिक रुपात यतीमुनीच्या वेषात वावरणारे एक ईश्वरीय अवतार म्हणून ओळखल
जातात. त्यांच्या मधुरवाणीत व वर्तणुकीत तत्वज्ञान होेते. जीवमात्रांचे कल्याण व्हावे, या हेतुने सर्वांशी संपर्क करीत ते परिभ्रमण करीत राहिले. जेथे जातील तेथे त्यांनी प्रासंगिक निरुपण केेले. अध्यात्मिक तत्व सांगितले. त्यांनी सांगितलेल्या तत्वसिद्धांतानुसार महानुभाव पंथाची बैठक आहे. अशा थोर भगवंताचा अर्थात भगवान श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या भगवान श्रीचक्रधरस्वामींच्या पदस्पर्शाने भिंगार एक पुण्यनगरी ठरले, असे म्हणावयास हरकत नाही. महानुभाव पंथियांप्रमाणे इतरही भाविक श्रद्धेने भिंगारला दर्शनास येतात. या देवस्थानचा राज्य शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करून विकास व्हावा, अशी भाविकांची अपेक्षा आहे.
बाळासाहेब शेटेमाझा मोबाईल- 9767093939
— बाळासाहेब शेटे
Leave a Reply