कारकिर्दीबद्दलच्या महत्त्वाकांक्षेमुळे बरेचदा स्त्रिया कौटुंबिक सुखाशी तडजोड करतात. गर्भावस्था आणि बाळंतपण यासाठी आता मोठ्या शहरांमधील उच्चपदस्थ महिलांकडे वेळ राहिलेला नाही. त्यामुळे आजकाल बरीच जोडपी बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतात. नवी जबाबदारी अंगावर घेऊन कारकिर्दीशी तडजोड करणे त्यांना मान्य नसते. जोडीदाराबरोबर स्वतंत्र आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असतो.कारकिर्दीची असंख्य कवाडे खुली होत असताना स्त्तियांच्या मानसिकतेमध्ये कमालीचा बदल घडून येत आहे. मात्र, ही मानसिकता अचानक तयार झालेली नाही. ही प्रक्रिया आकार घेण्यासाठी बराच काळ लागला. पूर्वी स्त्रियांना घराच्याच नव्हे तर स्वयंपाकघराच्याही बाहेर येण्याची परवानगी नव्हती. चूल आणि मूल एवढेच त्यांचे विश्व असायचे. घरामध्ये किती खर्च होतो, कोणकोणते व्यवहार होतात याचा त्यांना थांगपत्ताही नसायचा. हळूहळू समाज बदलू लागला. स्त्तियांनाही घराबाहेर पडण्याचा आणि जग जाणून घेण्याचा अधिकार आहे हे समाजाला पटू लागले. घरातली जबाबदारी सांभाळून त्या घराबाहेर पडू लागल्या, चौकट ओलांडून कारकिर्दीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवू लागल्या. मात्र, कारकीर्द घडवताना घराकडे दुर्लक्ष करण्याचा विचार त्यांच्या मनाला शिवला नव्हता. हळूहळू ही परिस्थितीही मागे पडली. कारकिर्दीची उत्तुंग स्वप्ने पहात असताना आता स्त्रिया कुटुंबाशी, नात्यांशी तडजोड करायलाही तयार असतात. कारकिर्दीमध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेणाऱ्या स्त्तियांची सं’या वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचा ट्रेंड केव्हाच रूजला आहे. आता हा ट्रेंड हळूहळू इतर शहरांकडे वळू लागला आहे.खरे तर मातृत्त्व ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुखद घटना. बाळाला जन्म देणे म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म .
रंतु, आता कारकिर्दीसाठी मातृत्त्वाशी तडजोड करण्याची काहीजणींची तयारी पहायला मिळू लागली आहे. पती-पत्नी एकमेकांच्या साथीने कारकिर्दीला वळण देत असतात, यशाचे शिखर सर करत असतात. अशा वेळी बाळाला जन्म देण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. कारण असा निर्णय
घेतल्यावर मधल्या नऊ महिन्यांच्या काळात जग खूप पुढे गेलेले असते. त्यामुळे स्पर्धेमध्ये आपण मागे पडू अशी भीती त्यांना वाटत असते. त्यामुळे हल्ली काही जोडपी बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतात. या संदर्भातले सुषमाचे उदाहरण बोलके आहे.सुषमा आणि निखिल दोघांनी मिळून अॅडव्हेंचर स्पोर्टस् कंपनी सुरू केली आहे. साहसी पर्यटकांसाठी वेगवेगळी शिबिरे, सहली, कॅम्प्स आयोजित करण्याचे काम ते करतात. हे काम करत असताना त्यांना पैसा मिळतो आणि समाधानही. दोघांसमोर सध्या बरीच मोठी प्रोजेक्टस् आहेत. ती प्रोजेक्टस् महत्त्वाकांक्षेने पूर्ण करण्याएवढा आत्मविश्वासही त्यांच्याकडे आहे. कारकिर्दीच्या अशा वळणावर असताना बाळाचा निर्णय घेऊन कारकिर्दीमध्ये खंड पाडण्याची त्यांची इच्छा नाही. सुषमा म्हणते, ‘आम्ही सतत प्रवासात, टूरवर असल्यामुळे कधी, कुठे जावे लागेल ते सांगता येत नाही. आमचेच आयुष्य अनिश्चित असताना बाळाचा निर्णय कसा घेता येईल ? बाळाला अनिश्चित आयुष्य देण्यापेक्षा सध्या तरी तसा विचार न केलेलाच बरा.’बाळाला जन्माला घालणे आणि न घालणे याबाबत बरेच मतप्रवाह आहेत. काहींच्या मते आजकाल कारकिर्दीला असाधारण महत्त्व प्राप्त झाल्यामुळे बाळाचा निर्णय उशिरा घेतला जातो. बाळ उशिरा झाले की इतर गोष्टीही लांबतात. अशा वेळी आपण 58 वर्षाचे झाल्यावर मुलगा 17-18 वर्षांचा असतो. म्हणजे निवृत्तीनंतरही त्याच्या शिक्षणासाठी, इतर खर्चांसाठी झटणे अनिवार्य असते. परिस्थितीनुरूप आणि वयानुरूप ते शक्यही नसते. ही परिस्थिती टा ण
यासाठी बाळाला जगात न आणणेच योग्य असा एक मतप्रवाह आहे. दुसर्या मतप्रवाहानुसार पती-पत्नी कारकिर्दीमध्ये व्यस्त असताना मुलांचे खूप हाल होतात. आई-वडील मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे मुले एकलकोंडी होतात. एखादा जीव जन्माला आल्यावर त्याचे हाल होण्यापेक्षा तो जन्माला न येणेच हिताचे ठरते असे बर्याच जोडप्यांचे म्हणणे असते. पूर्वीच्या काळी मूल नसलेल्या जोडप्यांना समाजात दुय्यम स्थान मिळायचे. आता मात्र, मूल नसणे हा त्या जोडप्याचाच निर्णय असतो.मूल नसल्यामुळे जोडप्यांना नैराश्य येऊ शकते असा समज आजपर्यंत प्रचलित होता. आता हा समज मागे पडला आहे. कारकिर्दीमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये पती-पत्नी एकमेकांच्या बरोबर असतात. त्यामुळे त्यांना तिसर्याची उणीव भासत नाही. काही जोडप्यांना मूल म्हणजे अडचण वाटते. एखाद्या जीवासाठी आपली कारकीर्द पणाला लावणे त्यांना पटत नाही. मुलाचे बालपण, शाळा आणि महाविद्यालयांचा खर्च, उच्चशिक्षण, लग्न या सर्व गदारोळामध्ये पती-पत्नीला स्वत:साठी वेळच देता येत नाही. कारकिर्दीच्या स्वप्नाशी तडजोड करणे त्यांना मान्य नसते. त्यामुळे आयुष्यात यश मिळवायचे असेल तर दोघांनी एकमेकांच्या साथीने जगणेच त्यांना सोयीचे वाटते. बरेचदा कारकीर्द घडवत असताना पती-पत्नीचेही एकमेकांशी पटेनासे होते. मतभेद विकोपाला गेले तर घटस्फोटाचा निर्णय घेतला जातो. अशा वेळी बाळाची जबाबदारी असेल तर घटस्फोट घेताना अडचण येते. त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे मूल नसणेच त्यांच्या दृष्टीने हिताचे ठरते, जोडप्यांना आयुष्यात तिसर्याची साथ हवीच असेल तर पाळीव प्राणी हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय असतो. पाळीव प्राण्यावर आपल्या मायेची पारख करता येते आणि तोही आपल्या मुलाप्रमाणेच वाटतो. त्यामुळेच ‘हम दो, हमारे दो’ चा ना ा म
गे पडला असून आता ‘हम दो, हमारा कोई नही’चा नारा पुढे येत आहे.चौकट-सुरुवातकामाचा ताण आणि पद टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड यामुळे स्त्रियांना मातृत्त्वाचे सुख अनुभवताना काही तडजोड करावीच लागते. सामान्यपणे ज्या स्त्रियांच्या प्रजननक्षमतेमध्ये काही बिघाड आहे त्याच स्त्रिया आतापर्यंत सरोगसीचा पर्याय अवलंबत होत्या. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. उत्तम आरोग्य असलेल्या स्त्तिया केवळ कारकिर्दीसाठी हा निर्णय घेतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, करिअरिस्टिक जोडपी लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या एक-दोन वर्षांमध्ये गर्भाच्या दृष्टीने वेगवेगळ्या चाचण्या करून दोघांचेही स्वास्थ्य उत्तम असल्याची खात्री करून घेतात. त्यानंतर वेळ वाचवण्यासाठी आणि कारकिर्दीत येणारा अडथळा दूर करण्यासाठी
सरोगसीचा अर्थात आपले मूल दुसर्या महिलेच्या पोटी वाढवण्याचा निर्णय घेतात. एका आरोग्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, उच्च पदावर असलेल्या आणि कारकिर्दीमध्ये मोठ्या जबाबदार्या पेलणार्या स्त्रिया आजकाल सामान्य गर्भावस्थेऐवजी सरोगसीला पसंती देतात.चौकट-शेवट(अद्वैत फीचर्स)
— प्रज्ञा केळकर
Leave a Reply