नवीन लेखन...

हरभजनचा ‘मास्टर स्ट्रोक’



न्यूझिलंडविरुद्धच्या अहमदाबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर असताना मोक्याच्या क्षणी हरभजनसिंगने चमकदार शतक झळकावून हा पराभव टाळला. आजवर आपल्या गोलंदाजीने देशाला विजय मिळवून देणार्‍या या सिंगने पहिले-वहिले कसोटी शतक झळकावून फलंदाजीतही आपण कमी नसल्याचे सिद्ध केले.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारतभेटीदरम्यान एक सिंग म्हणजेच पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग याची कामगिरी लक्षात राहण्याजोगी ठरली. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भारत अमेरिकेचा रोजगार चोरणार नाही (इंडिया इज नॉट इन द बिझिनेस ऑफ स्टिलिंग द अमेरिकन जॉब्ज) असे निक्षून सांगितले. तसेच पाक सरकारने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केल्याशिवाय त्या देशाशी चर्चा सुरू करण्यास ठाम नकार दिला. एकीकडे मनमोहनसिंग अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसमोर ठामभूमिका घेत असताना दुसरीकडे क्रिकेटच्या मैदानावर दुसरा एक सिंग म्हणजेच हरभजनसिंग तेजाने तळपत होता. हरभजनने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर भारताची लाज राखली.खरे तर हरभजन फिरकी गोलंदाज. तोही जागतिक किर्तीचा. बिशनसिंग बेदी, मणिंदरसिंग या शिख फिरकी गोलंदाजांच्या पंक्तित जाऊन बसणार्‍या हरभजनसिंगने फलंदाजीत चमक दाखवण्याचे काहीच कारण नव्हते, कारण स्पिन गोलंदाजाने (किंबहुना कोणत्याही गोलंदाजाने) चांगली फलंदाजी करू नये असा आपल्याकडचा प्रघात. बेदी आणि मणिंदरसिंग यांनी हा प्रघात कसोशिने पाळला. गोलंदाजाचा चेंडू अडवण्यासाठी मागे यष्ट्या असताना आपण मध्ये बॅट कशाला घालायची असा त्यांचा विचार असावा; परंतु हरभजनसिंगने हा प्रघात मोडला. सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन आडवे-तिडवे फटके मारायचे आणि बळी जाईपर्यंत वेगाने धावा जमवायच्या असा त्याचा दृष्टीकोन होता. परंतु गेल

या काही वर्षात त्याच्या फलंदाजीत विलक्षण सुधारणा झाली. गोलंदाजीमध्ये ‘दुसरा’ विकसित करून विविध पंचांसहीत फलंदाजांनाही त्याने आ-वासायला लावला. त्याचवेळी त्याने फलंदाजीतही सातत्य दाखवण्यास सुरुवात केले. फटक्यांवर नियंत्रण राखले आणि फटके मारण्यासाठी योग्य चेंडूंची निवड केली. तर तुही कसोटीत शतक झळकवू शकशील असा विश्वास

त्याला सचिन आणि सेहवागने दिला. या विश्वासाला

पात्र ठरत त्याने अहमदाबाद कसोटीत किवींविरुद्ध शतक झळकावले.किवीं सारख्या कमकुवत गोलंदाजीविरुद्ध शतक झळकवणे ही फार मोठी गोष्ट नव्हे; ज्या परिस्थितीत हरभजनसिंगने शतक झळकावले आणि भारताला पराभवाच्या खाईतून बाहेर काढले त्याबद्दल त्याला दाद दिली पाहिजे. किवींचा भारत दौरा त्यांच्या बांगलादेश दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर सुरू झाला. बांगलादेशमध्ये त्यांनी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 4-0 असा सपाटून मार खाल्ला होता. त्याचवेळी इकडे भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा व्हाईट वॉश करून आपला संघ अव्वल दर्जाचा कसा आहे हे सिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर किवींचाही सहज व्हॉईटवॉश होईल अशी अपेक्षा होती; परंतु पहिल्याच कसोटीतील दुसर्‍या डावात किवी गोलंदाजांनी भारताची पाच बाद 17 अशी अवस्था करून सामन्यात रंगत निर्माण केली. भारताचे धाबे दणाणले. सेहवाग, गंभीर, द्रविड, तेंडुलकर आणि धोनी हे महत्त्वाचे मोहरे तंबूत परतले होते. या वेळी 1983 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या पाच बाद 17 अशा अवस्थेची आठवण झाली. त्या वेळी कपिलदेवने कर्णधारपदाला साजेशी नाबाद १७५ धावांची खेळी करत संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला होता. परंतु आता तसा चमत्कार पुन्हा घडेल याची शाश्वती नव्हती. पण कांगारुंविरुद्ध इशांत शर्माला हाताशी घेऊन विजय मिळवून देणारा लक्ष्मण या वेळीही धाऊन आला. या
ेळी त्याने हरभजनसिंगला हाताशी धरले असे म्हणणे म्हणजे हरभजनचा अपमान ठरेल. रथी-महारथी भारतीय फलंदाजांना तंबूत पाठवणार्‍या किवी गोलंदाजांची हरभजनने यथेच्छ धुलाई करत तडाखेबंद शतक झळकावले. सुरुवातीला त्याने लक्ष्मणच्या साथीत गोलंदाजांना मान देऊन आणखी बळी जाणार नाही याची खबरदारी घेतली. त्यानंतर भात्यातील एकेक फटका बाहेर काढत धावसंख्याही वाढवत नेली. पंचांच्या मेहेरबानी मुळे लक्ष्मणचे शतक केवळ नऊ धावांनी हुकले. परंतु हरभजनने कारकिर्दीत पहिल्यांदाच हा टप्पा पार करताना भारताचा लाजिरवाणा पराभव टाळण्यात यश मिळवले.पहिल्या डावात सेहवाग आणि द्रविड यांनी शतके झळकावूनही मधल्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे भारत 400 चा टप्पा तरी पार करतो की नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. तिथेही हरभजनने आक्रमक अर्धशतक झळकावून धावसंख्या 500 च्या जवळपास नेऊन ठेवली होती. त्यावेळी शतक झळकावण्याचे अपूर्ण राहिलेले त्याचे स्वप्न दुसर्‍या डावात पूर्ण झाले. या शतकाचे श्रेय त्याने लक्ष्मणला दिले. प्रत्येक टप्प्यावर लक्ष्मणने योग्य मार्गदर्शन केल्यामुळेच आपण हे शतक झळकावू शकलो अशी प्रांजळ कबुली देतानाच त्याने आपण शतक झळकावू शकतो हा विश्वास सचिन आणि सेहवागने दिल्याचेही मान्य केले. पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसर्‍या डावात शतक या फलंदाजीतील कामगिरीमुळे हरभजनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने गोलंदाजीत सामनावीराचे अनेक पुरस्कार मिळवले असले तरी फलंदाजीमुळे हा पुरस्कार मिळेल असे त्याला स्वप्नातही वाटले नसावे. या सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना त्याने पहिल्या-वहिल्या कसोटी शतकापेक्षाही देशाचा पराभव टाळण्याचा आपल्याला अधिक आनंद झाल्याचे मत व्यक्त केले. आजवर हरभजनने अनेकदा गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे. काही वेळा तो गैरवर्तनामुळेह
चर्चेत राहिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅण्ड्र्यू सायमंड्सवर वर्णभेदी टिप्पणी केल्याचा कथित आरोप असो किंवा आयपीएलच्या सामन्यानंतर श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावण्याचा प्रकार असो, त्याची प्रतिमा ‘गरम’सिंग अशीच बनली होती. पण देशासाठी खेळताना सर्वस्व ओतून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. या कसोटी सामन्यातही त्याने देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा ध्यास दाखवून दिला. खेळपट्टी गोलंदाजांना अजिबात साथ देत नसल्याने त्याच्यासहीत इतर गोलंदाजांची कामगिरीही सुमारच राहिली, पण त्याची कसर त्याने फलंदाजीत काढून देशाचा पराभव टाळला. याक्षणी तरी हाच सिंग किंग असल्याचे सिद्ध झाले आहे.(अद्वैत फीचर्स)

— महेश जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..