नवीन लेखन...

हरहुन्नरी पाटील आणि वेळकाढू ‘क्लोज’





18 ऑगस्ट 1956 रोजी मुंबईत संदीप मधुसूदन पाटीलचा जन्म झाला. क्रिकेटसोबतच संदीपने पॉप गायक आणि चित्रपट अभिनेता (कभी अजनबी थे हा तो चित्रपट) म्हणून काम केलेले आहे. 15 जानेवारी 1980 रोजी संदीपचे कसोटीपदार्पण घडले पाकविरुद्ध चेन्नईत. त्याच्या खेळातील आक्रमकता लगेचच दिसून आली. दिसायला देखणा, गायक, अभिनेता आणि आक्रमक फलंदाज … एकहाती प्रेक्षक खेचण्याची ताकद संदीपकडे होती.
त्याचा पहिला दौरा होता तो कांगारूंच्या भूमीचा. अ‍ॅडलेडवर डेनिस लिली आणि लेन पास्कोच्या मार्‍यासमोर त्याने 174 धावा काढल्या. नंतर एक-दोन मालिकांसाठी तो संघात नव्हता. पुन्हा संघात आल्यावर इंग्लिश दौर्‍यात ओल्ड ट्रॅफर्डवर त्याने बॉब विलीसच्या एका षटकात 6 चौकार लगावले. यापैकी एक चौकार नोबॉलवर आलेला होता आणि षटकातील चौथ्या वैध चेंडूवर धावा निघाल्या नव्हत्या – 4 4 4 0 4 4 4. 1983च्या विश्वचषकविजेत्या संघात त्याचा समावेश होता.
गायक, अभिनेता, कसोटीपटू होणे कमी होते म्हणून की काय अखेरच्या काही हंगामांमध्ये संदीपने मध्य प्रदेशच्या रणजी संघाचे नेतृत्व केले. नंतर तो प्रशिक्षक बनला. केनियाचा संघ 2003च्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत पोहचला तेव्हा त्यांचा प्रशिक्षक संदीप पाटीलच होता.
’एकच षटकार’ नावाच्या मासिकाचे संपादन संदीपने केले आहे. आपल्या नावाच्या आंग्लाळलेल्या रुपाशी नाते सांगणारे त्याचे ‘सॅन्डी स्टॉर्म’ नावाचे आत्मचरित्र 1984मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
क्रिकेटच्या नियमांवर दूरगामी परिणाम करणारी एक घटना या तारखेला सन 1967मध्ये घडली. एजबॅस्ट्नवरील काऊंटी स्पर्धेच्या सामन्यात वॉर्विकशायरचा पाठलाग यशस्वी ठरण्याची चिन्हे असताना यॉर्कशायरने मुद्दामहून वेळ लावण्याचे धोरण अवलंबले. ‘वेळ कसा मारुन न्यावा’ नावाचे पुस्तक वाचून आल्याप्रमाणे यॉर्की कप्तान वागत होता. ते त
याने वाचलेले नसेल तर कुणीही रसिक प्रेक्षक बसल्या बसल्या या शीर्षकाचे पुस्तक लिहून पूर्ण करू शकला असता! इंग्रजांना हे खपणार नव्हतेच. कप्तान ब्रायन क्लोज

खपला. त्याच्याकडून इंग्लंडचे कर्णधारपद काढून घेण्यात

आले. प्रतिस्पर्धी संघाच्या विजयाच्या शक्यता संपुष्टात आणण्याची मुभा गोलंदाजी करणार्‍या संघाला राहू नये म्हणून सर्व प्रथमश्रेणी सामन्यांच्या प्रत्येक दिवसाच्या अखेरच्या एका तासात 15 षटके फेकली गेलीच पाहिजेत असा नियम करण्यात आला. ही षटके ‘अनिवार्य षटके’ (मॅन्डेटरी ओवर्स) म्हणून ओळखली जातात.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..