हर्निया हा सहज आढळणारा आजार आहे. तो सगळ्या वयोगटांमध्ये व स्त्री-पुरुष अशा दोन्हींतही दिसतो. हर्निया म्हणजे आपल्या पोटाचे स्नायू कमजोर होतात, पोटात काहीशी पोकळी निर्माण होते आणि पोटातील आतडी बाहेर येऊन फुगा निर्माण करतात. मोठे आतडे किंवा लहान आतडे हर्नियाच्या पिशवीत ओढ लागणे, फुगा दिसणे, फुगा कमी-जास्त होणे, पोट फुगणे यांसारखी लक्षणे दिसतात.ही लक्षणे हळूहळू किंवा अचानक दिसतात. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रमाणात दुखत असते. काही लोकांना वाटते, की पोटात काहीतरी फुटले आहे किंवा काहीतरी वेगळ्या दिशेने जात आहे. आणखी काही लक्षणे अशी -अशक्तपणा जाणवणे, पोटात आग होणे, दुखणे.पोटातील फुगा, जांघेत दिसतो. मात्र खोकला काढल्यावर किंवा झोपल्यावर तो दिसत नाही.काहीतरी जडान्न खाल्ल्यानंतर खोकला आला तर दुखते.पोटातील कुठल्याही भागात हर्निया होऊ शकतो, पण सगळ्यात जास्त हर्निया जांघेत दिसतो.
हर्नियाचे तीन प्रकार आहेत -१) जांघेतील हर्निया, २) बेंबीतील हर्निया, ३) शस्त्रक्रियेनंतर होणारा हर्निया.
हर्नियामध्ये घ्यावयाची काळजी – शरीराला कमीत कमी ताण द्यावा. कारण तेवढ्यानेही पोटात दुखून अस्वस्थता वाढते. ऑपरेशनमुळे हा त्रास कमी होतो. ट्रिटमेंट न दिल्यास हर्निया वाढू शकतो व एक वैद्यकीय आणीबाणी निर्माण होऊ शकते. वर्षानुवर्षे साधा वाटणारा हर्निया अचानक आतडे अडकल्यामुळे ऐनवेळी जिवाला धोका उत्पन्न करू शकतो. हर्निया हा अचानक मोठा होऊ शकतो किंवा अडकू शकतो आणि त्यात अडकलेल्या आतड्याचे गॅंग्रीन होऊ शकते. अशा वेळी त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यावाचून इलाज नसतो.
हर्निया कसा बरा करतात?
हर्निया बरा करण्याचे वेगवेगळे प्रकार वापरता येतात. १) टेन्शन रिपेअर, २) टेन्शन फ्री रिपेअर, ३) दुर्बिणीतून टेन्शन फ्री उपचार. रुग्णांसाठी सगळ्यात चांगली पद्धत कुठली आहे, ज्या पद्धतीच्या वापरानंतर शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला त्रास होणार नाही, हे डॉक्टयर ठरवतात. आधुनिक शस्त्रक्रियेत साधी भूल दिली जाते. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन दिवस रुग्णालयात राहावे लागते आणि आठवड्याच्या आत कामावर रुजू होणे शक्यध होते. अत्याधुनिक थ्रीडी मेश पद्धतीमुळे हे सर्व सहज शक्ये झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ:- डॉ. जयश्री तोडकर
Leave a Reply