आपल्याला जीवनात आजपर्यंत शेकडो व्यक्ती भेटल्या असतील. जेवढ्या भेटल्या त्यातील मोजक्याच व्यक्तींची ओळख आपल्याला असते. कारण आपण फारच विसरभोळे आहोत. पण काही लोकांची खासियत आहे, ते समोरच्या माणसाचा चेहरा पाहताच चटकन नाव घेऊन ओळखतात. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते आपल्या कार्यकर्त्याला नावागावानिशी ओळखतात. त्यांच्यासारखी बरीच माणस आपल्या आजुबाजुलाही असतात. पण आपले त्यांच्याकडे लक्ष नसते. कारण आपण आपल्याच तोऱ्यात समाजात वावरत असतो. माझी किती ओळख आहे. हे दुसऱ्यांना दाखविण्यासाठी सतत धडपडत असतो. प्रत्यक्षात त्याला कोणी ओळखत नसते.
— जनार्दन गव्हाळे
जनार्दन गव्हाळे, खामगाव. जि. बुलढाणा विदर्भ