‘मधुबन मे राधिका नाचे रे’, ‘ये जिंदगी उसी की हैं’ या अजरामर गाण्यातील सतारीचे सुर, ‘मुगल-ए-आझम’, ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटांसाठीच्या सतार वादनासाठी सतारवादक उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांचे नाव लक्षात राहील.
उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांचे नाव पं. रवीशंकर, उस्ताद विलायतखान यांच्या जोडीने घेतले जात असे. त्यांनी सतारवादनात स्वत:चा ‘जाफरखानी’ बाज निर्माण केला. इंदौर घराण्याचे असलेल्या जाफर खान यांनी सतार वादनाची स्वतंत्र शैली निर्माण केली होती. संगीत नाटक अकादमी, ‘पद्मभूषण’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
हिंदी चित्रपटसृष्टीतील फिरोज निजामी, अनिल-विश्वास, शंकर जयकिशन, मदनमोहन, सी. रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई आदी दिग्गज संगीतकारांबरोबर काम केले होते. हलिम अकादमी ऑफ म्युझिक या संस्थेचे ते संस्थापक होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना सतारवादन शिकविले. जुनेन खान, राजेंद्र वर्मन, हरीशंकर भट्टाचार्य, रवींद्र चारी, झुबेर शेख आदी शिष्य परिवारातील काही ठळक नावे आहेत.
ज्येष्ठ सतारवादक हलिम जाफर खान यांचे ४ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply