नवीन लेखन...

हा तर खरा बौद्धिक व्यायाम

नियमितपणे सकाळी फिरावयास जाणे हे ठरून गेलेले होते. निवृतीच्या काळात अत्यंत सोपा व चांगला शरीराच्या सर्व अवयवांना पोषक असा हा व्यायाम आहे. कित्येक वर्षे त्याचे नियमित पालन केले जात आहे.

एक दिवस सकाळी फिरण्यास बाहेर पडलो असता, रस्त्यामध्ये एक ९ ते १० वर्षाचा शाळकरी मुलगा रस्त्याच्या कडेला थांबून आपली नादुरुस्त सायकल ठीक करण्याचा प्रयत्न करीत होता. सायकलच्या पायड्ल जवळची साखळी (चेन) ही बेरीन्गच्या चाकावरुन निसटली होती. मुलगा परेशान झालेला होता. त्याची सर्व बोटे व हात वंगनाणी बरबटलेली होती. शाळेची वेळ होत असल्यमुळे त्याच्या चेहऱ्यावर तगमग स्पष्ट दिसत होती. लोक जात येत होते. बहुतेकजन आपल्या समयबद्धतेमुळे धावपळीत होते. मी अचानक त्याचा जवळ गेलो. त्याचा सायकलीची निसटलेली चेन थोडासा प्रयत्न करून पूर्ववत केली. त्याला हातरुमाल दिला. त्यांनी हात साफ केले. त्याची सायकल त्याचा हाती दिली. मुलाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता. माझे आभार मानून तो शाळा गाठण्यासाठी वेगाने निघून गेला.

तस म्हणाल तर मी फारस कांही केल नव्हत. म्हंटल तर क्षुल्लक. परन्तु कसलेसे समाधान, शांतता, मनला आनंदीत करीत असल्याची जाणीव येत होती. रोजच्या फिरण्याच्या व्ययामामुळे मनाला उल्हसित वाटण्याचे जेवढ़े कार्य झाले नव्हते, तेवढे त्या छोट्याशा प्रसंगाने झाले. व मानसिक समाधान लाभले. शारीरिक व्यायाम ही जरी गरज असली, तरी मानसिक समाधान ज्या योगे प्राप्त होते, तो हाच खारा बौद्धिक व्यायाम नव्हे काय?

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..