हनी ईरानी यांना डर, कोई मिल गया, और लम्हे साठी ओळखले जाते. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९५५ रोजी झाला. त्या लेखक व अभिनेत्री आहेत. मा.हनी ईरानी या मा.जावेद अख्तर यांची पहीली पत्नी आहेत. योगायोग हा की हनी ईरानी यांच्या वाढदिवसाबरोबर मा.जावेद अख्तर यांचा पण वाढदिवस असतो. १९७२ मध्ये त्यांनी लग्न केले. फरहान अख्तर व जोया अख्तर ही मा.हनी ईरानी व मा.जावेद अख्तर यांची मुले. मा.हनी ईरानी या लहान पासून चित्रपटात काम करत होत्या. त्यांनी पहिल्या चित्रपटात काम वयाच्या ३ वर्षी केले,ज्यात मेहमूद होते. मा.हनी ईरानी अजूनही लेखन करतात, त्यांनी कोई मिल गया व डीडीएलजे या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
Leave a Reply