गोव्याचे उपमुख्यमंत्री श्री फ्रान्सिस डिसूझा यांचे “भारतात राहणारे सर्व भारतीय हिंदूच आहेत” – या मोठ्या मनाने केलेया विधानाबद्दल अभिनंदन करावयास हवे. हे विधान केल्याने त्यांच्या काथोलिक असण्यावर कुठलीच बाधा येत नाही.
माझ्या कडे युथ एक्ष्चेन्ज मध्ये आलेली क्लारा कोप्पेल ही जर्मन युवती म्हणते “मी ख्रिश्चन असून हरतालिकेची पूजा केली तर काय हरकत आहे?” ती एवढे म्हणून थांबली नाही..तिने मनोभावे पूजा देखील केली. केवळ ती ख्रीस्चन आहे म्हणून हरतालिका तिची प्रार्थना स्वीकार करणार नाही असे नाही. किंवा पूजा / आरती केल्याने तिच्यातील काथोलिक पणा कमी झाला असे नाही. आम्ही जर्मन्स इंडियाला “इंद” म्हणतो मग तुम्ही भारत किंवा इंडिया असे का म्हणता? तिने सहज विचारले. मलाही तिच्या प्रश्नात तथ्य असल्याचे जाणवले.
शेजारील सिलोन.. नाव बदलून श्री लंका करते, पाकिस्तान स्वतःला फक्त पाकिस्तान म्हणते , बांगलादेशला स्वतःला बंगला देश ( देश काही उर्दू किंवा अरबी शब्द नाही ) म्हणतांना काही वाटत नाही. भारताला चीन, तुर्की, पाकिस्तानी, इजीप्शियांस, अरबी, इराणी लोक “हिंद” म्हणून सम्बोधतात आणी भारतीयांना “ईंदू” म्हणतात… मग आपणच आपल्या देशाला भारत आणी इंग्रजीत इंडिया अशा दोन नावांनी संबोधन का मान्य करतो. संविधानान पहिल्याच अनुच्छेदात “India, that is Bharat, shall be a union of states” असा दोन्ही नावाचा स्वीकार करण्या मागची वैचारिकता उलगडत नाही. इंडिया- इंग्लिश, येंद किंवा इंद् – फ्रेंच आणी ग्रीक असे पाश्चात्यांनी अपभ्रन्षित केलेले इंडिया हे नाव भारतीय संविधानात घेतांना नक्की काय विचार करण्यात आला असावा.
हिंदुस्तान नावाचा स्वीकार करण्यात त्यातील हिंदू या शब्दाची अडचण होत असेल. त्यांना आपले पूर्वज हिंदू होते हे स्वीकारणे जड जाईल म्हणून म्हणून भारत नावाला प्रथा पसंती दिली गेली. हे करतांना हिंदुस्तान नावाला आक्षेप घेणाऱ्यांच्या – जेथे भरताची संतती म्हणजे वंशज वास्तव्य करतात तो भारत म्हणजे आपण भरताची संतती असल्याचा स्वीकार हे लक्षात कसे आले नाही.
विविध पुराणात संस्कृत मध्ये उल्लेख असलेले भरताचे भारतवर्ष म्हणजे भारत ..
उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।
या विष्णू पुराणातल्या श्लोका प्रमाणे समुद्राच्या उत्तरेला आणी हिमालयाच्या दक्षिणेला वसलेल्या प्रदेशाला भारत म्हणतात जेथे भरताची संतती वास्तव्य करते. आधुनिक भारतात संमिश्र वंशाचे लोक वास्तव्य करतात.सगळेच भारताचे वंशज नाहीत आणि बऱ्याच लोकांना ही वस्तुस्थिती स्वीकार्य पण होणार नाही.
या उलट हिंदुस्तान हे नाव भौगोलिक स्थानावरून आहे, सिंधू नदीच्या दक्षिणे कडील भागावरून आहे, त्यामुळे कुठल्याही जाती, धर्म, पंथ, वंश यांनी बाधित नाही. हिंदुस्तानात राहणारे ते हिंदू.
ज्यू लोकांत जर्मन ज्यू, रशियन ज्यू, ईंडी ज्यू अशी भौगोलिक मूल दर्शक ओळख मान्य आहे .ख्रिश्चन धर्मियां मध्ये रोमन काथोलिक, ग्रीक ख्रिश्चन जर्मन ख्रिश्चन अशी भौगोलिक मूल दर्शक ओळख देण्यात कुणाला अडचण नाही.एवढेच नव्हे तर मुस्लीम समाजाला – केरळी मुस्लीम, आंध्र मुस्लीम, बिहारी मुस्लीम अशी ओळख स्वीकार्य असतांना भारतीय मुस्लीम ( भरताचे वंशज ) म्हणायला अडचण नाही पण हिंदुस्तानी मुस्लीम म्हणायला अडचण आहे असे म्हणण्या मागे केवळ राजकीय हेतू किंवा मतपेटी प्रेम हे एकच कारण असू शकते.
आपण बेंगलुरू, भूबनेस्वर, चेन्नई, मेंगलुरु,मुंबई, कोलकाता असे गावांच्या नावांचे हिंदीकरण स्वीकार केले. हिंद महासागर, हिंदी राष्ट्रभाषा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा हे गीत स्वीकार केले मग भारत ( वंश मुलक) किंवा इंडिया ( अपभ्रन्षित) या दोन्ही नावांना बदलून “हिंदुस्तान” हे भौगोलिक नाव संपूर्ण राष्ट्राने स्वीकारायला काहीच अडचण असू शकत नाही. खर तर हिंदू हा धर्म नसून कुठलाही एक संस्थापक नसलेला, कुठलाही एक धर्म ग्रंथ नसलेला,कुठलाही धर्म प्रसार न करणारा सनातन हा सर्व समावेशक असा मानवधर्म आहे – खऱ्या अर्थाने “सेक्यलर” म्हणजे सर्व धर्मी समानत्व किंवा सर्व विचारांना धर्मांना प्रेमान, आदरान, वागवणारी जीवन पद्धती आहे.
माझे स्वतःचे देशात आणि देशाबाहेर सर्व धर्मीय अतिशय जवळचे मित्र आहेत. आम्हा सर्वांना एकमेकांच्या धर्म बद्दल नितांत आदर आहे.
गोव्याचे उप मुख्य मंत्री फ्रान्सिस डीसुझा यांचे “इंडिया हे मुळातच हिंदू राष्ट्र आहे” या विधानान कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावल्या जाण्याचे कारण नाही. याउलट सर्व धर्मीय भारतीयांनी एकत्र येऊन आपण सर्व हिंदी ( (भाषांतर – Indian) म्हणजे हिंदी मुस्लीम, हिंदी ख्रिश्चन, हिंदी सिख, हिंदी जैन, हिंदी ज्यू किंवा हिंदी हिंदू आहोत या बद्दल राष्ट्राभिमान बाळगावा आणि भारत – इंडिया ही दोन्ही नावे सोडून हिंदुस्तान या “सेक्युलर” – सर्वधर्म समावेशक आणि भौगोलिक नावाचा राष्ट्र म्हणून स्वीकार करावा.
पुरुषोत्तम आगवण
— पुरुषोत्तम आगवण
Leave a Reply