आपला भारतदेश अडीच हजार वर्षांपासून परकीय आक्रमणाच्या अमलाखाली राहिला आहे. सिंकदरापासून शक, हुण, मोगल, फे्रंच, इंग्रज, डच पोर्तुगीज आदींनी भारतावर अव्याहतपणे आक्रमण केली. या सतत होणार्या आक्रमणांनी भारत देश जर्जर झाला असला तरी वाकला नाही, नैतिक बळाच्या जोरावर तो आजही ठामपणे उभा आहे. याचे मुख्य कारण आपली हिंदू संस्कृती. हिंदू संस्कृतीची पाळेमुळे या देशात खोलवर रूजली आहे, अशा या उदात्त संस्कृतीची महती मनी बाळगणारे मा. श्री. कृष्णाप्पाजी यांनी देशभर फिरून परिवार प्रबोधन हा विषय चालविला. हिंदू संस्कृतीचे महत्त्व नवीन पिढीला कळावे, ह्या हेतूने त्यांनी हा उपक्रम राबविला. त्यांनी दिलेल्या व्याख्यानाच्या आधारे श्री. प्रशांत वाजपेयी यांनी मुळ हिंदी पुस्तकाचे संकलन व संपादन केलेले आणि त्या आधारे नचिकेत प्रकाशनाने ङ्गहिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का?ङ्घ ऋषिनिर्मित हिंदू परिवार व्यवस्था हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात अतिशय सरळ सोप्या पद्धतीने हा विषय मांडला आहे.
आपला देश देवनिर्मित आहे. हिमालयात समारभ्य या व हिन्दू सरोवरम तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते – बार्हस्पत्य हिमालयापासून हिंदुसरोवरापर्यंत जी एक विस्तृत भूमी ईश्वराने निर्माण केली आहे, त्या भूमीला हिंदूस्थान म्हणतात. म्हणूनच भारतात जन्माला येणारा प्रत्येक जण स्वत: भाग्यवान समजतो. एवढेच नव्हे तर जगातील प्रबुद्ध लोकांमध्ये हिंदू विचारांचा अरुणोदय झाला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अमेरिकेतील एका सर्वेक्षणानुसार असे म्हटले आहे की 33 टक्के अमेरिकन हिंदू संस्कार आणि परंपरांचे अनुकरण करतात. 33 टक्के लोक ख्रिश्चन असून हिंदू संस्काराप्रमाणे अंत्यसंस्काराची मागणी करतात. 25 टक्के लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. हे सोदाहरण या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे. हिंदू विचारधारा आणि पाश्र्चिमात्य विचारधारा, हिंदू संकल्पनेचे वैशिष्ट काय, चिंतनचर्चा व व्यवहारासाठी काही विषय, आमचे घर हिंदू जीवनाची वैशिष्टे, हिंदू परंपरांची वैशिष्ट्ये, हिंदूचा स्त्री विषयक दृष्टिकोन आदी बारीक सारीक कल्पनांचा उहापोह अतिशय सोप्या भाषेत सांगितला आहे.
कुटुंब ही नागरिक जीवनाची पाठशाळा आहे. आजच्या शिक्षणप्रणालीमुळे प्रत्येक जण स्व-केंद्रीत होत चालला आहे. कुटुंबातील घटकांमधील संवाद दिवसेंदिवस लुप्त होत चालला आहे आज समाज आणि कुटुंब या दोहोंना संस्कारीत करण्याची गरज आहे. मित्र, आप्तमंडळी, भाऊ बहीण, स्वकीयांशी संवाद व्हायला हवा. म्हणजे संपर्क आणि सुसंवादामुळे आपले सामर्थ्य अधिक प्रबळ होईल.
सर्व मराठी वाचकांपर्यंत हिंदू – कुटुंब व्यवस्थेचे हे श्रृतिरूप विचार पोहचविण्याच्या उद्देशाने, मूळ हिंदी पुस्तकाचे मराठी भाषांतर सामाजिक दायित्वाच्या भावनेने प्रकाशित केल्याबद्दल नचिकेत प्रकाशनचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. सर्वांनी हे पुस्तक वाचून त्याप्रमाणे आपले घर, व्यवहार व आचरण ठेवण्याचा प्रयत्नकेला तरच नचिकेत प्रकाशनाचा हा उपक्रम सफल होऊ शकेल.
हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का? अर्थात ऋषिनिर्मित हिंदू परिवार अवस्था
पाने : 68
किंमत : 80 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
अनिल सांबरे
नचिकेत प्रकाशन, नागपूर
9225210130
— ऍडमीन
Leave a Reply