नवीन लेखन...

हिंदू मना बन दगड


आज हिंदू धर्मावर इतर धर्मीयांचे संकट आहेच. पण तितकेच किंवा त्याहूनही अधिक स्वकीयांचे संकट आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्लीत एका पोलीस संमेलनात’भारतात भगवा आतंकवाद अस्तित्वात आहे आणि तो कमी धोकादायक नाही.’ असे विधान केले.भालचंद्र नेमाडेंनी तर ’हिंदू: जगण्याची एक समृद्ध अडगळ’ ही कादंबरी लिहीली. त्यात त्यांनी हिंदूद्वेष्टे विधाने केली आहेत. यावरून अनेक हिंदूंच्या भावना दुखावल्या. अर्थातच हिंदूंनी हवा तसा विरोध केला नाही. नेमाडे काय आणि चिदंबरम काय, दोघेही हिंदूच. हे हिंदूंचे दुर्दैव. आपलेच लोक आपल्या धर्मावर टिका करतात. अन्य धर्मीय त्यांच्या धर्मावर अशी टिका करत नाही. कारण ते संघटित आहेत, आक्रमक आहेत. हिंदू हे अतिसहिष्णू आहेत. गृहमंत्र्यांनी जर “हिरवा आतंकवाद”असे म्हटले असते, तर ह्या हिरव्यांनी त्यांची लूंगी उचलून त्यांच्यावर कोणता प्रसंग आणला असता?याची परिपूर्ण जाणीव चिदंबरम यांना होती. म्हणूनच त्यांना भगव्या आतंकवादाचा साक्षात्कार झाला असावा, असो.ख्रिश्चन आणि मुस्लिम यांना बायबल आणि कुराण हे बाळकडू म्हणून पाजले जाते. तसे हिंदूंमध्ये होत नाही. हिंदूंना मुळात धर्मशिक्षणच मिळत नाही. म्हणूनच आज हिंदूंमध्ये ब्राम्हण द्वेष वाढत चालला आहे. काही स्वघोशीत ईतिहास संशोधक जन्माला येत आहेत. त्यांनी तर ब्राम्हणांना धारेवरच धरले आहे. मग दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नसतात. समर्थ रामदास शिवरायांना कधी भेटलेच नसतात. ते औरंगझेबाचे हेर असतात. अशा काही भूलथापा हे नव-ईतिहास संशोधक मारत अहेत.रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव हे दोन्ही महापुरुष ब्राम्हण होते. म्हणूनच त्यांच्यावर असले आरोप होत आहेत. या ईतिहास सं ोधकांना इतकेच सांगायचे आहे की त्यांनी भारताच्या ईतिहासाचा सखोल आभ्यास करावा. प
किय आक्रमणांनी हिंदूस्तानात सर्वात जास्त कत्तल ब्राम्हणांची केली.कारण त्यांना ठाऊक होते की ब्राम्हण हे हिंदू धर्माचे तारक आहेत. आज महाराष्ट्राच्या एक

टक्का लोकसंख्या सुद्धा ब्राम्हण समाज राहीला नाही. ही हिंदूंची शोकांतिका आहे. इथे इतकेच सांगावासे वाटते की आर्य चाणक्यांपासून ते सावरकरांपर्यंत देशासाठी त्याग करणारे ब्राम्हण होते.

गांधी-नेहरू कुटूंबांनी हिंदूस्तानची सूत्रे हातात घेतली आणि हिंदूस्तानचा इंडिया कधी झाला कळलेच नाही. आज हिंदूंवर पक्षपाती असण्याचा आरोप होत आहे. भारताचा राष्ट्रपती मुसलमान होतो,महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुसलमान होतो आणि तरीसुद्धा हिंदू हे पक्षपाती कसे? कधी विचार करून पहा, “बाळासाहेब ठाकरे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले” अहो विचार काय स्वप्न सुद्धा पडणार नाही. जगात चार प्रमुख धर्मांचे लोक राहतात. ख्रिश्चन हे पहील्या क्रमांकावर असून त्यांची अनेक राष्ट्रे आहेत.मुस्लिम हे दुसर्‍या क्रमांकावर असून त्यांचीही अनेक राष्ट्रे आहेत. बौद्ध हे तिसर्‍या क्रमांकावर आहेत आणि त्यांचे सुद्धा काही देश आहेत. हिंदू हे चौथ्या क्रमांकावर असूनही त्यांचा एकही देश ह्या भूतलावर नाही. होय, आपण इंडियात राहतो, हिंदूस्तानात नव्हे. हे प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवले पाहीजे.जगातील बावन्न मुस्लिम राष्ट्रांपैकी असे एकही राष्ट्र नाही जे हज यात्रेसाठी विशेष सवलती देते. पण भारतात मुस्लिमांना अनेक सवलती आहेत. १९४७च्या फाळणीनंतर पाकिस्तानात २४ टक्के असलेले हिंदू आज केवळ १ टक्का उरले आहेत. बांगलादेशात ३० टक्के असलेले हिंदू आज फक्त ७ टक्के इतकेच आहेत. याउलट भारतात मुस्लिमांची संख्या वाढतच आहे. कसाब आणि अफ़जल ग रुला सरकार पोसत आहे आणि एकिकडे हिंदू धर्माभिमानी साध्वी प्रग्न्यासिंग यांचा छळ होत आहे. बदोद्दात रस्ता रुंदीकरण्यासाठी बारा मंदिरे पाडली. तोपर्यंत सर्वे शांत होते. पण दोन दर्गे पाडायला जाताच दंगे उसळले. तरीसुद्धा आम्ही हिंदू पक्षपाती कसे हो? कारण आम्ही सहीष्णू आहोत म्हणून?

हिंदूंमध्ये अनेक जाती असल्यामुळे ते संघटीत होऊ शकत नाही. ही परधर्मीयांनी मारलेली थाप आहे आणि आपण ती वस्तुस्थिती मानत आलो अहोत. लक्षात ठेवा मुस्लिमांमध्ये ६४० जाती आहेत आणि ख्रिश्चनांमध्ये २४२ पंथ आहेत. तर मग हिंदूंमध्ये अनेक जाती आहेत, अशी बोंब का? ख्रिस्ती धर्मात जाती नाहीत, अशी म्हणणारी मदर टेरेसा, जाती-निहाय आरक्षण मागासवर्गीय ख्रिस्त्यांना मिळावा म्हणून उपोषणाला बसली होती. हा इतर धर्मीयांचा डाव आपण ओळखला पाहीजे.जगाच्या ईतिहासात हिंदूंनी आपला धर्म कधीच कुणावर लादला नाही. जग जिंकण्याचाही अट्टाहास कधी केला नाही. हिंदू धर्म पसरावा म्हणून मिशनरी, मदरसे उभारले नाहीत. जो कुणी हिंदू नाही तो काफ़र आहे, असे कधीच मानले नाही. उलटपक्षी त्याला आपला बंधूच मानले आहे. त्याचे स्वागतच केले आहे. हिंदूंच्या सहिष्णूतेचा इतर धर्मीयांनी नेहमीच फायदा घेतला आहे. हिंदूंचा छळ केला आहे.यावर एकच अमोघ उपाय “हिंदू संघटन”.इथे विंदा करंदीकरांची एक कवीता आठवते ” माझ्या मना बन दगड”. करंदीकरांच्या कवीतेतलं मन हे जणू हिंदू मन आहे असे वाटते. खरेच हिंदूंना आता कणखर व्हायलाच हवे. विंदा करंदीकरांच्या शैलित सांगायचे झाले तर, हिंदू मना बन दगड…….हिंदू मना बन दगड…….लेखक: जयेश मेस्त्रीमोबाईल: ९८३३९७८३८४.ई-मेल : smartboy.mestry@gmail.com jaysathavan@gmail.com

— जयेश मेस्त्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..