ज्या अमेरिकेत प्रत्येक सहाव्या मिनिटाला एका अमेरिकन महिलेवर बलात्कार होतो आणि ५ पैकी एका महिलेवर आयुष्यात कधीना कधी एकदा तरी बलात्कार झालेला असतो, ज्या अमेरीकेत पुरुष सैनिक आपल्याच सहकारी महिला सैनिकावर बलात्कार करण्यात बदनाम झालेले आहेत, त्या अमेरिकेमध्ये जागतिक महिला दिनी – ८ मार्च २०१३ रोजी – दिल्लीमध्ये गेल्या वर्षी धावत्या बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाची बळी ठरलेल्या २३ वर्षीय तरुणीला आंतरराष्ट्रीय महिला साहस पुरस्काराने गौरविण्यात आले..
तिच्यावर अत्याचार झाला, ती पुरुषाच्या वासनेला बळी पडली, तिचा जीव गेला आणि हे राजकारणी तिचा जागतिक साहसी महिला म्हणून गौरव करत आहेत. अमेरिकेने आपल्या स्वतःच्या देशातील बलात्कारी महिलेचा असा पुरस्कार देवून कधी गौरव केला नाही.. आणि कोणताही संवेदनाशील देश (इंडिया सोडला तर) अश्या लांच्छनास्पद कृत्याला राष्ट्रीय अभिमानाचा विषय बनवणार नाही. पण आमची अवस्था “हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे” या म्हणी प्रमाणे “हुरळली इंडियन मेंढी लागली अमेरिकन लांडग्याच्या मागे” अशी झाली आहे. ………
ही बातमी आणि गेले तीन महिने या बलात्कारावर आपले राजकारणी, साधुसंत, सेलिब्रेटीज आणि मिडीया ज्या तर्हेने बेताल बडबड करत आहेत, बातम्या देत आहेत त्या वाचल्यावर १७/ १८ व्या शतकात मेलेल्या नवर्याबरोबर जिवंतपणी जाळल्या जाणार्या, सती जाणार्या स्त्रियांवरील अत्याचारांची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीं. स्त्रीला जिवंत जाळून मारायचे आणि वर ती सती गेली म्हणत तिचे मंदीर उभे करत तिची पूजा करायची तसाच हा प्रकार झाला आहे.
“ठणठणपाळ परभणीकर” यांचा हा झणझणीत लेख वाचा…
— ठणठणपाळ परभणीकर
Leave a Reply