एक राजा होता. आपल्या राज्यातील जनतेबाबत त्याला अतिशय काळजी होती. त्यामुळे जनतेच्या हितासाठी त्याचे सदैव प्रयत्न चालू असायचे. शिवाय हा राजा शब्दाला जागणारा होता. त्याच्या तोंडून कोणाला शब्द दिला गेला तर तो आपला शब्द खरा करून दाखविल्याशिवाय मुळीच राहायचा नाही. त्याचा प्रधानही अतिशय हुशार होता. त्यामुळे राजाचा राज्य कारभार सुरळीत चालू होता. एकदा राज्यात मोठा दुष्काळ पडला. त्यावर उपाययोजना करण्यासाठी म्हणून राजाने राजधानीतील सर्व प्रमुख नागरिकांची एक बैठक बोलावली. बैठक सुरू होताच राजाने सुरुवातीलाच सांगितले की, तुम्ही सर्व माझ्या भावासारखे आहात. आपल्या राज्यावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे. त्याहून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला जे उपाय सुचतील ते तुम्ही सांगू शकता. त्या बैठकीला नगरातील एक लबाड सावकारही उपस्थित होता. त्याने राजाचे भाषण लक्षपूर्वक ऐकले होते. राजा शब्दाला जागणारा आहे, हेही त्याला माहीत होते. त्याचा फायदा घेण्याचे त्याने या वेळी ठरविले. त्यामुळे त्याची पाळी येताच तो सावकार म्हणाला. राजेसाहेब तुम्ही आताच आम्हा सर्वाना भावासारखे मानले आहे. त्यामुळे मी आता तुमचा भाऊ झालो आहे. त्यामुळे तुमच्या संपत्तीत माझाही वाटा आहे. त्यामुळे तो वाटा मला आत्ता तुम्ही द्यावा. सावकाराची मागणी ऐकून बैठकीतील सारेचजण अचंबित झाले. आता राजा कोणता निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले. तेवढ्यात बैठकीला उपस्थित असलेले प्रधान म्हणाले की, आपले राजेसाहेब शब्दाला जागणारे आहेत. त्यामुळे ते आपल्या संपत्तीचा वाटा सावकाराला देतीलच, परंतु ‘ भाऊ’ म्हणून सावकाराचेही काही कर्तव्य आहे. राज्यावर दुष्काळाचे संकट आले आहे, त्यामुळे ते निवारण्यासाठी सावकार आधी आपली सारी संपत्ती राजाला दान करतील, अशी आशा आहे. बैठकीतील लोकांनी टाळ्या वाजवून प्रधानांच्या वक्तव्याला संमती दिली. लबाड सावकार मात्र चरफडत राहिला. राजाची अर्धी संपत्ती मिळविण्याच्या हव्यासापोटी त्याला स्वतःची संपत्ती गमावण्याची पाळी आली होती बैठकीनंतर सर्व गेल्यानंतर राजाने आपल्या हुशार प्रधानाला शाबासकी दिली.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...
अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर
अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
Leave a Reply