क्षमाशील वृत्तीमुळे वाईटातल्या वाईट माणसाचेही हृदयपरिवर्तन घडू शकते. यासंदर्भात समर्थ रामदास स्वामींची एक कथा खूपच अंतर्मुख करणारी आहे. समर्थ रामदास रोज भिक्षा मागून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. एकदा ते असेच भिक्षा मागण्यासाठी एका घरात गेले. त्या घरातील एक बाई शेणाने आपले अंगण सारवत होती. घरात काहीतरी कुरबूर झाल्याने ती बाई आधीच चिडली होती. त्यातच समर्थांनी तेथे येऊन भिक्षा मागितली. त्वामुळे ती बाई त्यांच्यावरच भडकली व त्यांना उद्देशून म्हणाली, हे गोसावड्या, भिक्षा मागायला तुला लाज कशी नाही वाटत, असे म्हणत तिने आपल्या हातातील शेणाचे पोतेरे समर्थांच्या अंगावर फेकले. त्यामुळे समर्थांचे अंग खराब झाले. मात्र ते त्या बाईवर मुळीच रागावले नाहीत. उलट ते तिला म्हणाले, माई हीच भिक्षा समजून मी ती आनंदाने स्वीकारेन. असे म्हणून ते पोतेरे घेऊन नदीवर गेले आणि नदीच्या खडकावर ते पोतेरे त्यानी स्वच्छ धुवायला सुरुवात केली. जसजसे ते पोतेरे स्वच्छ होऊ लागले. तसतसे इकडे त्या बाईच्या मनाची घालमेल सुरू झाली. कारण तिला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला होता. म्हणून ती स्वतःच समर्थांची माफी मागण्यासाठी बाहेर पडली. समर्थांना शोधत शोधत ती नदीवर गेली. तोपर्यंत समर्थांनी ते पोतेरे -स्वच्छ धुऊन वाळत घाललेले होते व वाळल्यानंतर त्यांनी त्या कापडाच्या वाती करायला सुरुवात केली होती. समर्थांना पाहताच त्या बाईने त्यांच्या पायावर डोके ठेवले व आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. मात्र समर्थांनी तिला केव्हाच माफ केले होते. ते तिला म्हणाले तुझी ‘भिक्षा’ खरोखरच मोठी होती, कारण त्याच वातीने श्रीराम व मारुतीरायाची मूर्ती उजळणार आहे. समर्थांचे बोल ऐकून ती बाई धन्य झाली.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply