ही गोष्ट आहे… संत एकनाथांची..
एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन त्यांच्यावर थुंकला. त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडलं. नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले. शिक्षकांनी ही गोष्ट वर्गात सांगितली आणि या गोष्टीचं तात्पर्य कुणी सांगेल का असं विचारलं.
ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :
१ – नाथ किती महान होते ते कळतं
२ – नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते
३ – माणसाने कसं वागावं ते ही गोष्ट शिकवते
४ – एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका
५ – रागावून त्रास तुम्हालाच
६ – शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वराचं
७ – दुसर्याला माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे
अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता.
शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत, त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकीनुसारच दिली पण, नाथांची हि गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं ते असं….की हिंदू समाज तेव्हा हि निद्रिस्त होता आणि आज हि आहे.”
शिक्षक म्हणाले, “काय बोलतोस तू…?, नाथांना चूक ठरवतोस?”.
तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या सन्यस्त वृत्तीला साजेसंच होतं. या कृतीमुळे ते संतपदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही. नाथ संत असले तरी तो हिंदू समाज संत नव्हता. जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता. नाथांनी जसं त्याचं काम केलं तसं हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होतं न की नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवणं”
हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता…….
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
(नेटवरुन आलेल्या फॉरवर्डवरुन)
— योगेश
Wow ! Kudos to SwatantryaVeer Savarkar !
He is beyond all praise !
my Pranaam to him.
– subhash Naik