होय मी हिंदू आहे, आणि याचा मला नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे. मी माझ्या हिंदुत्वाचे महत्व जाणतो, माझ्या धर्माचे धार्मिक, पौराणिक,शास्त्रीय, आणि सामाजिक महत्व अगदी १००% नाही परंतु ००१% तरी मला माहित आहे, आणि तेवढा एका हिंदूला स्वधर्माचा अभिमान बाळगण्यासाठी पुरेसा आहे. अशीच थोडी उदाहरण देतोय,कदाचित तुम्हीही हे वाचून हिंदू असल्याचा गर्व कराल. कारण आता ती गरज निर्माण झालीये.
ज्या धर्माच्या उत्पत्ती कालखंडाबद्दल कोणीही अजून ठाम विधान करू शकत नाही, तो फक्त हिंदू धर्मच, कारण जगाला जेव्हा लिहिणा वाचन कळत नव्हत, त्याच्या कित्येक वर्ष आधीपासून माझ्या धर्माचा आधार असलेले चार वेद, उपनिषदे, अठरा पुराणे आणि अनेक उपपुराणे अस्तित्वात आहेत. त्याच्या उत्पत्ती बद्दल आजही गूढच आहे. असा माझा धर्म हिंदूच…
जगातली प्रत्येक गोष्ट पवित्र आहे, प्रत्येक गोष्टीत देव आहे, अगदी दगडापासून पाण्यापर्यंत आणि मुंगी पासून हत्ती पर्यंत देव सर्वज्ञ आहे हीच शिकवण हिंदू धर्म देतो, आपण हिंदू ३३ कोटी देवांना विविध रुपात पुजतो, विश्वाच्या चराचराकडे आदराने बघण्याची शिकवण देणारा माझा धर्म हिंदूच…
लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, महाकाली अशा एक न अनेक स्त्रीरुपातून स्त्रीशाक्तीचे महत्व अधोरेखित करणारा माझा एकमेव धर्म हिंदूच…
इसविसन पूर्व ७०० च्या कालखंडाला साधारण आपण धातू युग असे म्हणतो, परंतु इसवि सन पूर्व २६०० चा कालखंड हा महाभारताचा कालखंडम्हणून संशोधनातून निष्पन्न झाल आहे. महाभारतात रथांचा आणि धातूंच्या शस्त्रांचा यथेच्छ वापर झाला. म्हणजे जगात धातुयुग यायच्या आधी आपण हि धातूची शस्त्रे आणि उपकरणे सहज वापरत होतो आणि हाताळत होतो. आणि त्याही पूर्वी रामायण घडलंय. त्यातही धातूचा वापर दिसून येतो. हा आता काही लोक याला दंतकथा मानतात पण काही पुरावे हे या घटना घडल्याच्या साक्षीदार आहेत. म्हणजे जगात सर्व पहिल्यांदा तंत्रज्ञानाचा वापर किवा त्याला उपयोग करणारा असा माझा धर्म हिंदूच…..
जगात अनेक धर्मांची स्थापना झाली, अनेक धर्मांचे अनेक पूजनीय देवदेवता अवतरले, पण त्यांचा उत्पत्ती काळ आणि उत्पत्ती प्रक्रिया सर्वश्रुत आहेत. असे असूनही ह्या सगळ्यांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे, आणि त्यांचा मन ठेवणे याची शिकवण देणारा माझा एकमेव धर्म हिंदूच….
वैद्यकशास्त्र, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, जीवशास्त्र अशा एक न अनेक शास्त्रीय गोष्टीचे महत्व पुरातन काळापासून जाणणारा आणि त्याबद्दलची स्पष्ट मत लिहित स्वरुपात जगासाठी हजारो वर्षापूर्वीच उपलब्ध करून देणारा असा माझा धर्म हिंदूच….
जगाने कर्मठ ठरवले असेल, जरी जातपात मानणारा असला तरी प्रत्येक जातीची विभागणी त्यांच्या गुणसूत्रावरून आणि त्यांचे शास्त्रीय फायदे तोटे याची माहिती देत जगासमोर लिखित स्वरुपात मांडणारा असा एकमेव धर्म हिंदूच…
अनेक जातिधर्म, अनेक शाखा, उपशाखा, अनेक नवीन धर्म यांना समर्थ पाने स्वताच्या अंगाखांद्यावर खेळवत स्वतःचे अस्तित्व तितक्याच ठामपणे जपणारा असा माझा धर्म हिंदूच….
अशा अनेक गोष्टी आहेत पण त्या सगळ्याच सांगायच्या ठरवल्या तर आयुष्य पुरणार नाही. पण स्वधर्माचा अभिमान बाळगण्यासाठी इतक पुरेसा आहे. असा मला वाटत. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणाऱ्या आणि त्या मृगजळाकडे धावणाऱ्या हे हिंदू तरुणानो आणि तरुणीनो स्वधर्माचे ज्ञान आत्मसात करा. मग पहा जग तुमच्या मागे धावेल . आणि म्हणूनच मला अशा धर्माचा नुसता अभिमान नाही तर गर्व आहे हिंदू असल्याचा.
होय मी हिंदू आहे…..
हिंदू गौरव
सौ जन्मों में पुण्य कमाए
तब जाके हिन्दू बन पाए ||१||
समय संस्कुती रहे पुकार
हिन्दू धर्म है जीवन आधार ||२||
मांग रहे है तुम्हारा साथ
धर्म बचाने बढाओ हाथ ||३||
धर्मं ही माता, धर्मं ही पिता
धर्मं से बड़ा न कोई नाता ||४||
गाओ मन से धर्मं गुणगान
गर्व से कहो के हिन्दू है हम ||५||
आपला
शैलेश देशपांडे…
— शैलेश देशपांडे उर्फ श…
Leave a Reply