काल-परवाच एक बातमी वाचली होती. रामदेवबाबांनी अरूणाचलमध्ये त्यांचं योग शिबीर भरविले होते.. योगाभ्यास घेताना मध्ये मध्ये ते वेगवेगळ्या विषयांवर बोलत होते… त्यावेळी त्यांनी देशात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि कॉंग्रेस याबाबात बोलाण्यास सुरूवात केली.. त्यावेळी तिथे कॉंग्रेसचेच अरूणाचलल मधुन निवडून आलेले एक सदस्य उपस्थित होते.. ते चिडले.. आणि चक्क रामदेव बाबांना म्हणाले ”यु ब्लडी इंडियनस्” (????) ही शिवी (होय शिवीच) फक्त रामदेव बाबांना नव्हती तर अवघ्या देशाला होती.. यावर ना त्या सदस्यानं वा कॉंग्रेसनं माफी मागितली….
मला ही घटना तुम्हाला परत सांगण्याचा उद्देश कोणत्याही पक्षावर कुरघोडी करण्याचा नाही.. काराण ही अक्षम्य चूक असली तरी हिला जबाबदार देशातील नेत्यांइतकेच तुम्ही आम्ही आहोत..
आपल्याच देशाचा ईशान्य उत्तर भाग म्हणजे नैसर्गिक समृध्दीनं नटलेला, मनानं श्रीमंत आणि देशाची संस्कृती जपणारा भाग… सेव्हन सिस्टरस्.. पण या भागाचा विकास किती झाला? तिथले रस्ते.. शाळा.. वाहतूकीचे मार्ग…देशाच्या विकासाच्या तूलनेत.. ह्यांच्या वाटेला इतकी उपेक्षा का?
इथे शाळा आहेत पण त्याही अमेरिकन मिशनरीज् चालवतात.. इथे कॉलेजेस पुरेशी नाहीत.. अगदी नाही म्हणण्या इतकी… मेडिकल आणि इंजिनिअर कॉलेजेस् तर सात राज्य मिळून एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहेत… परत इथे भाषेच वैविध्य इतकं आहे की एका गावातली भाषा दुसर्या गावातल्या माणसाला जेमतेम कळत असेल तरी नशिब.. आणि इथल्या ज्या काही शाळा आहेत तिथे आपली राष्ट्रभाषा हिंदी शिकवलीच जात नाही…संवाद साधायचा तो कसा? तरी बरं ज्या गावांत वीज पोहचली अशा ठिकाणी टि.व्हीपण पोहचला.. आणि टि.व्हीवर दाखवल्या जाणार्या हिंदी मालिकांमुळे का होइना या लोकांना तुटक हिंदी यायला लागालं.. पण याच टिव्हीचा दुरुपयोग म्हणजे इथल्या लोकांना आपला देश आणि देशाताल्या इतर राज्यात होणारा विकास दिसला..आणि
आपल्या बाबात होणारी उपक्षाही जाणवायाला लागली.. आणि बोचायाला लागाली… त्यातूनच माओवादींचा जन्म होऊ लागला…
वर चीन त्यांना सांगतोय तूम्ही भारतीय नाही तर चीनी आहात.. तुम्ही इकडे या..शिकायाला.. काम करायला.. पासपोर्ट विझा काही गरज नाही..तुम्ही आमचाचभाग आहात… मात्र ते भारतीय असल्याचा विसर पडू न देता येतात आपल्या शहरात… तेव्हा आपणच त्यांना चीनी आणि जपानी समजतो.. आपण जेव्हा त्यांना विचारतो की कोणत्या देशातून आलात? तेव्हा त्यांना काय वाटत असेल? आपले रिक्षावाले..टॉक्सीवाले..दुकानदार त्यांना काय वागणूक देतात..आणि आपणही.. त्यांना वेगळच ठेवतो की..
स्वत:च्या देशातून झिडकारा..परकेपणा.. त्याच वेळी चीन आणि अमेरिकन देशातून मदत.. त्याना जिव्हाळा कोणा बद्दल वाटेल? आजही तिथे जाऊन येणार््यांच्या तोंडुन ऐकलयं..तिथे ‘अतिथी देवो भव’ची प्रचीती मिळते..आजही एकलव्याची परंपरा जपणारे तिथले लोक अंगठ्याचा वापर न करता धनुष्यबाण चालवतात…एकीकडे परंपरा जपणार ही मंडळी दिसते तर दुसरीकडे धक्कादायक दृष्य… मिझोराम हे राज्यच बघा ना? त्याच्या नावातच राम आहे.. स्वातंत्र्य मिळण्याआधी मिझोराम मध्ये फक्त २ टक्के जनता ख्रिश्चन धर्मिय होती मात्र आता तिथे ९९ टक्के लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे. का? कारण तिथल्या अमेरिकन मिशनरीज् त्यांच्या मुलांना शिक्षण देतात..आणि वेगवेगळ्या पध्दतने स्वत:च्या धर्माचा प्रचार करतात… आता तिथल्या निवडणुकांमध्ये उभे राहायाचे झाले तरी जिजसचे नाव घेऊनच प्रचार करावा लागतो नाहीतर पराभव ठरलेला असतो… इतकेच नाही तर या रामराज्याच्या एअरपोर्टवर गेलात तर धक्कादायक वाक्य तूम्हाला दिसेल… This land is belongs to jesus… इथे कुठेही ते राज्य भारतीय असल्याची खुण आहे का?
हो ते भारतीयच आहेत पण आपण त्यांचा स्वीकार करत नाही.. प्रत्येक वेळी राजकीय मंडळींना शिव्या घालण्यापेक्षा आपण त्यांच आदरातिथ्य का नाही करत… आपण त्यांना आपले बांधव म्हणून वागवुयात…त्यांच्या मनाला झालेल्या जखमांचे आपणही तितकेच दोषी आहोत.. काही पक्ष जागा मिळण्याच्या हव्यासापोटी असही राजकारण करतात.. पाण अपन नागरिक म्हणुन काही जबाबदार्या पूर्ण केल्या तर बरेच प्रश्न सोडवायाला मदत होइल हे तितकेच खरे….
— स्नेहा जैन
Leave a Reply