श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोर्या एकत्र करुन खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले. या कथेला अनुसरुन हा काला व दही हंडी फोडण्याची प्रथा सुरु झाली असावी.
सध्या याला काही ठिकाणी विकृत
स्वरुप येत आहे. कोणत्याही रंगाच्या हंड्या बांधतात, त्या फोडतात. त्यामुळे तो रंग एक-तर दोन-तीन दिवस जात नाही तर काही वेळा त्याचे नको ते परिणाम भोगावे लागतात.
खरे पाहता दह्याची हंडी बांधणे आवश्यक आहे. अशा बांधलेल्या हंड्या फोडून आनंद व्यक्त केला जातो. मातीच्या खापर्या घरी नेऊन ठेवतात. यामुळे दूध-दुभत्याची समृद्धि होते असे मानले जाते. हा उत्सव विशेषत: कोकणात प्रसिद्ध आहे.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply