अश्विन शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्र, घट:स्थापना होते. नवरात्र म्हणजे ९ दिवस व ९ रात्र अशी समजूत आहे. काही वेळा आठ किंवा दहा दिवस येतात. त्यावेळी यावर चर्चा सुरु होते. यावर धर्मसिंधू ग्रंथात असे म्हटले आहे – “अश्विन शुक्ल प्रतिपदमारभ्य महानवमीपर्यंत क्रियमाण कर्मनामदेयम्” अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून महानवमिपर्यंत करावयाचे कर्म म्हणजे नवरात्र. या काळात वृद्धी तिथी असल्यास दिवस वाढतो किंवा क्षय तिथी आल्यास दिवस कमी होतो. म्हणून नवरात्रात किती दिवस हा प्रश्न नाही. या नवरात्रात कुलांचाराप्रमाणे सर्व विधी करावे. न्यूनाधिक करू नये. नवरात्रांत काही कुलाचारात प्रत्यक्ष देवीची प्रतिमा आणून पूजन करतात, काही ठिकाणी मातीच्या घटाची स्थापना करतात. अश्विन शुक्ल प्रतिपदेला मातामह श्राद्ध करतात. तसे पाहता श्राद्धाचा अधिकार पितृनिधनानंतर प्राप्त होतो. हे श्राद्ध आईच्या वडिलांचे आहे. या श्रद्धाला वडील हयात असताना सुद्धा अधिकार आहे. हे श्राद्ध जीवतपितृकाने करावे असे शास्त्र वचन आहे.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply