श्रावण कृष्ण अष्टमीला विष्णूंचा आठवा अवतार भगवान कृष्णांचा जन्म झाला. त्यांचा जन्म मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, बुधवारी मथुरेत बंदीशाळेत (कारागृहात) झाला. या निमित्ताने हे व्रत करण्याची प्रथा आहे. सप्तमीचे दिवशी एकभुक्त राहून, अष्टमीला व्रताचा संकल्प करून, पूजेच्या जागेवर, फुले, पाने, वेली यांनी वातावरण सुशोभित करतात. तेथेच सूतिका गृह तयार करतात.
पूजेच्या चौरंगावर देवकी, श्रीकृष्ण यांची स्थापना करतात. दुसर्या बाजूला यशोदा, तिची कन्या, वसुदेव, नंद यांच्या मूर्तीची स्थापना करून मध्यरात्री शूचिर्भूत होऊन पूजा करतात.
नवमीचे दिवशी पंचोपचारांनी उत्तरपूजा करतात. व मातीच्या मूर्तीचे जलाशयात विसर्जन करतात. हा सण उत्सव संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन इत्यादी क्षेत्रात विशेष थाटाने हा उत्सव साजरा होतो.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply