नवीन लेखन...

सप्टेंबर १५ – कोल्हा कादिर आणि स्फोटक नॅथन असल

१५ सप्टेंबर १९५५ रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात अब्दुल कादिर खानचा जन्म झाला. पदार्पणावेळी दाखविलेल्या धडाक्यातच बराच काळ खेळत राहिलेला एक श्रेष्ठ लेगस्पिनर म्हणून कादिरची सार्थ ओळख क्रिकेटविश्वाला आहे.
पाकिस्तानी कर्णधार इम्रान खान हा इतर अनेक गोष्टींबरोबरच एक कल्पक कर्णधार म्हणून ओळखला जातो. लेगस्पिन १९८० च्या दशकात फारशी चर्चेत नव्हती पण ती बुडालेली कला नाही अशी इम्रानची खात्री होती आणि त्याचा फायदा कादिरला झाला. इसवी सनाचे १९७७ वे वर्ष संपता संपता कादिरने कसोटीपदार्पण साजरे केले इंग्लंडविरुद्ध.
लेगस्पिनची रया गेलेली असताना अब्दुल कादिरची पाकिस्तानी संघात झालेली निवड ही ऐतिहासिक महत्त्वाची घटना मानावी लागेल. त्याच्या निवडीमुळे अनेक उदयोन्मुख फिरकीपटूंची आपल्या कौशल्याच्या उपयुक्ततेचा काळ संपलेला नसल्याची खात्री पटली. पारंपरिक लेगब्रेक, टॉपस्पिन, गुगली आणि फ्लिपरच्या जोरावर कादिर आपल्या गोलंदाजीत वैविध्य आणी आणि त्याच्या नैसर्गिक प्रतिभेला अनुभवामुळे जसजसा उजाळा मिळत गेला तसतसा तो अधिकाधिक भेदक गोलंदाज बनला. ‘कोल्हा कादिर’ अशी सार्थ उपाधी त्याला मिळाली.
हबिब बॅंक लिमिटेड, लाहोर आणि पंजाब हे मायदेशातील त्याचे प्रथमश्रेणी संघ. पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने पाकिस्तानचे नेतृत्वही केले. ६७ कसोटी सामन्यांमधून २३६ तर १०४ एदिसांमधून १३२ बळी त्याने मिळवले.

१५ सप्टेंबर १९७१ रोजी न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्चमध्ये जन्माला आलेल्या एका बालकाच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान द्विशतक आहे. नॅथन जॉन असल त्याचं नाव.
न्यूझीलंडकडून एदिसांमधून सलामीला येणारा नॅथन कसोट्यांमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करी. याव्यतिरिक्त तो ‘जोडी-मोडू’ असा उपयुक्त मध्यमगती गोलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षकही होता.
१६ एकदिवसीय आणि ११ कसोटी शतके असलच्या नावावर आहेत. २००२ मध्ये क्राईस्टचर्चमधील जेड स्टेडिअमवर त्याने विक्रमी द्विशतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या त्या कसोटीत त्याने केवळ १६८ कंदुकांवर २२२ धावा तडकावल्या. पहिल्या १०० धावांसाठी ११४ चेंडू घेणार्‍या नॅथनने दुसर्‍या १०० धावा अवघ्या ३९ चेंडूंमध्येच

जमविल्या. एकूण १५३ चेंडूंमध्येच त्याने २०० चा पल्ला गाठला. कसोटी इतिहासातील द्विशतकांचा कमीत कमी चेंडूंनुसार क्रम लावल्यास नॅथन असलचे हे द्विशतक कमी चेंडूंच्या बाबतीत आजही पहिल्या क्रमांकाचे ठरते. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सामन्याचा तो चौथा डाव होता आणि विजयासाठी ५५० धावांचे लक्ष्य होते. असल बाद झाला तेव्हा हे लक्ष्य ९९ धावांच्या अंतरावर आले होते.
२००७ चा विश्वचषक दीड महिन्यांवर आलेला असताना नॅथनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

१५ सप्टेंबर १९५५ रोजी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात अब्दुल कादिर खानचा जन्म झाला. पदार्पणावेळी दाखविलेल्या धडाक्यातच बराच काळ खेळत राहिलेला एक श्रेष्ठ लेगस्पिनर म्हणून कादिरची सार्थ ओळख क्रिकेटविश्वाला आहे. १५ सप्टेंबर १९७१ रोजी न्यूझीलंडमधील क्राईस्टचर्चमध्ये जन्माला आलेल्या एका बालकाच्या नावावर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान द्विशतक आहे. नॅथन जॉन असल त्याचं नाव.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..