६० सेकंदांचा एक मिनिट (सेकंदभराचा अवधी कायम कसा राखला जातो हे ठाऊक असले तरी सर्वप्रथम तो कसा निर्धारित केला गेला हे ठाऊक नाही.), ६० मिनिटांचा एक तास, २४ तासांचा एक दिवस आणि अशा ३६५ (किंवा ३६६) दिवसांचे एक वर्ष इतकी असंगत रचना करून सोयीनुसार तथाकथित वर्षारंभ बातम्या येणार्या जवळपास सर्वच ठिकाणांहून साजरा केला जातो. असो. हॅपी न्यू मोमेन्ट्स टू ऑल.
१ जानेवारी १९९५ हा दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या दिल्ली विरुद्ध हिमाचल प्रदेश या सामन्याचा दुसरा दिवस होता. नाणेकौल जिंकून हिमाचलला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या दिल्लीने हिमाचलला २०५ धावांमध्ये पहिल्या दिवशीच गुंडाळले होते. रमण लांबा आणि रवी सहगल या सलामीच्या जोडीने दिल्लीला पहिल्या दिवस-अखेर १४८ धावांची भरभक्कम सलामी मिळवून दिलेली होती. सहगल ७० आणि लांबा ६४.
दुसर्या दिवशी सहगलने आपले शतक पूर्ण केले, मग दीडशतक आणि पुढे द्विशतक. अखेर २१६ धावांवर तो बाद झाला. कर्णधार रमण लांबा थांबण्याची मात्र कोणतीही चिन्हे नव्हती. रवी सहगल-रमण लांबा या जोडीने दिल्लीला तब्बल ४६४ धावांची सलामी दिलेली होती. आजही भारतातील कोणत्याही प्रथमश्रेणी सामन्यासाठी हा विक्रम आहे.
पहिल्या जोडीसाठीच्या भागीदारीचे विक्रम :
विसविशीत सामने :
महिला आंतरराष्ट्रीय- १७० धावा. फ्रित्झ-चेट्टी ही जोडी. द. आफ्रिका वि. नेदरलँड्स.
पुरुष आंतरराष्ट्रीय- १७० धावा. ग्रॅएम स्मिथ-लूट्झ बोस्मन. द. आफ्रिका वि. इंग्लंड.
भारतीय विक्रम- १३६ धावा. सेहवाग-गंभीर. इंग्लंडविरुद्ध.
पुरुष मान्यताप्राप्त- १७५ धावा. विक्रम सोळंकी-ग्रॅएम हिक. वुर्सेस्टर्शायर वि. नॉर्दम्प्टनशायर.
एकदिवसीय सामने :
महिला आंतरराष्ट्रीय- २६८ धावा. टेलर-अॅटकिन्स. इंग्लंड वि. द. आफ्रिका.
भारतीय विक्रम- अखंडित २५८ धावा. रेश्मा गांधी-मिथाली राज. आयर्लंडविरुद्ध.
पुरुष आंतरराष्ट्रीय- २८६ धावा. उपुल थरंगा-सनथ जयसुरिया.
श्रीलंका वि. इंग्लंड.
भारतीय विक्रम- २५८ धावा. गांगुली-तेंडुलकर. केनियाविरुद्ध.
पुरुष यादी अ- अखंडित ३२६ धावा. गुलाम अली-सोहेल जाफर. पाकिस्तानातील स्थानिक स्पर्धा.
कसोटी सामने :
४१५ धावा. नील मॅकेन्झी-ग्रॅएम स्मिथ. द. आफ्रिका वि. बांग्लादेश.
भारतीय विक्रम- ४१३ धावा. विनू मंकड-पंकज रॉय. वि. न्यूझीलंड.
प्रथमश्रेणी सामने :
५६१ धावा. वहीद मिर्झा-मन्सूर अख्तर. कराची व्हाईट्स वि. क्वेट्टा.
भारतीय विक्रम- उपरोल्लेखित.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply