नवीन लेखन...

मनुष्य श्रेष्ठ की प्राणी?

एका बंगल्याच्या गेटसमोर उभा दीनवाणी आणि रडत उभा असलेल्या एका चार वर्षीय मुलाला पाहून बंगल्याचा रखवालदार जरासा रागवत त्याला म्हणाला, काय रे भिकारी, भूक लागली का? पण मी काय करू शकत नाही. या बंगल्याचा मालक खूपच खडूस आहे. तुला येथे त्याने येथे पाहिले तर माझी नोकरी जाईल. काय नाव आहे, तुझे? भिकारी. हो भिकारीच नाव आहे माझे. आत्ता तुम्हीच म्हणाला नाहीत का काय भिकारी? तो मुलगा निरागस चेहर्‍याने स्वतःविषयी सांगू लागला. लहानपणी आई-वडिल सोडून गेले. नातेवाईकांनी माझ्या वाट्याची मालमत्ता हडप करण्यासाठी माझा खून करण्याचा कट रचल्याने घर सोडले. हे कळल्यानंतर रखवालदाराने त्याल गुपचूप भाकरी आणि भाजी आणून दिली. मुलाने जेवण केले. आता हा सिलसिलाच सुरू झाला. दररोज बंगल्याच्या गेटवर मुलगा येणार, रखवालदार त्याला भाकरी-भाजी देणार. मात्र एकेदिवशी खडूस मालकाने पाहिल्यानंतर हा सिलसिला बंद झाला. मात्र भुकेच्या तडाख्यामुळे आणि भाकरी मिळेल, या आशेने तसे मुलगा बंगल्याच्या गेटवर आला. मात्र त्या दिवशी रखवालदारही आला नाही आणि त्याला भाकर मिळाली नाही. मात्र आशेपोटी वाट पाहून बंगल्यापासून थोडे लांब असलेल्या एका झाडाखाली झोपला. सकाळी उठल्यावर बंगल्याच्या गेटसमोर गेल्यावर रखवालदराने त्याच्याकडे लक्ष न देता मालकाच्या गलेलठ्ठ कुत्रीला भाकरी खायला दिली. परंतू, कुत्रीने तोंड लावले नाही. ती सारखी त्या मुलाकडे पहायची. एक-दोन-तीन नव्हे तर चार दिवसानंतरही त्या कुत्रीने भाकरीला तोंड लावले नाही. दरम्यान ती हा मुलगा खायचा. मात्र शेवटी मालकाने पाहिले आणि त्याला मारहाण करून तेथून हाकलून लावले. तो तसाच बंगल्याच्या गेटजवळील मोकळ्या जागेत थांबला. त्याच्याकडे पहात-पहात त्या मुक्या कुत्रीने डोळ्यांतून अश्रू गाळत प्राण सोडले. ही काही एखाद्या चित्रपटाचे कथानक नाही. किंवा तुमच्या-आमच्या करमणुकीसाठी सांगितलेली कथा नाही. मी रेडिओवरून ऐकलेला हा प्रसंग सत्य की काल्पनिक हा तसा गौण मुद्दा आहे. मात्र या प्रसंगावरून ज्याला मन आहे, आणि जो इतरांसमोर आपले मन मोकळे करू शकतो. तो मनुष्य श्रेष्ठ की ज्या कुत्रीला आपल्या भावना सांगता येत नाही, भुकेलेल्या मुलाकडे पहात डोळ्यांतून अश्रू गाळत प्राण सोडणारी ती बिचारी मुकी कुत्री श्रेष्ठ याचा विचार तुम्हीच करा. (२)कृष्ण- पूर्ण पुरुषोत्तम एक दिव्य साहित्यकृती कृष्णकृपामूर्ती स्वामी ए. सी भक्तिवेदांत प्रभुपाद रचित कृष्ण- पूर्ण पुरुषोत्तम हा ग्रंथ खरोखरेच एक दिव्य साहित्यकृती आहे. आजच्या मायेच्या बजबजपुरीत असे साहित्य अवश्य वाचायला हवे. कला, विज्ञान, साहित्य, तत्वज्ञान आणि धर्म अशा विविधांगी विचार प्रणालीबरोबरच भगवत्प्रेम फलित करणारा हा दिव्य ग्रंथ ज्यांनी वाचला ते खरेच भाग्यवान आहेत. ज्यांनी वाचला नाही त्यांनी हा ग्रंथ वाचून सृष्टीच्या सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांचे चरित्र समजून घ्यावे. मनुष्यांच्या धार्मिक जीवनाच्या नियामक तत्वांना जेव्हा शिथिलता येते आणि अधार्मिक प्रवृत्ती बळावतात, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण होतात. पापकृत्याचा भार कमी करण्यासाठी आवश्यकता हे सृष्टीच्या निमिर्तीचे प्रमुख कारण आहे. भगवान महाविष्णू हे भगवंतांचा अवतार. भगवंत श्रीविष्णुंद्वारे प्रकट झाले. कृष्णकथा दोन प्रकारच्या आहेत. श्रीमद्भगवतगीता हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली तर श्रीमद्भागवत हे त्यांनी केलेल्या लिलाचरित्र आहे. या कृष्णकथा जगभर प्रसारित करण्याची भगवान चैतन्य महाप्रभूंची आज्ञा शिरोधार्य मानून स्वामी प्रभुपादांनी या अप्रतिम ग्रंथांची रचना केली. नाना प्रकारच्या वेदनांनी त्रस्त झालेले बद्ध जीव जर या कृष्णकथा श्रवण अधिकारी व्यक्तींकडून अतिशय विनयाने, नम्रतेने करतील, तर त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होईल असा ठाम विश्‍वास प्रभुपादांना आहे. त्यांच्या हृदयातील कामरोग पूर्णपणे नष्ट होईल. भौतिक काम जीवनाचा प्रतिकार करण्यासाठी कृष्णकथेचे श्रवण आवश्यक आहे. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात निवास करतात आणि बाह्य जगतात विश्‍वरुपाने उपस्थित आहेत. श्रीमद्भगवद्गीतेच्या शिकवणुकीनुसार ते सर्वांना आपल्या दिव्य धामात बोलावून घेण्यासाठी आपल्या मूळ रुपाने मानव समाजात प्रकट होतात. भगवंतांच्या परमधामात सूर्यप्रकाश तसेच वीजेची आवश्यकता नाही. तेथे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष असून वर्षभर दूध देणार्‍या सुरभी गायी आहेत. कुठलीही चिंत नसलेल्या या परमधामात जाण्यासाठी कुठल्या विमानाची गरज नसून खरी गरज आहे ती भगवान श्रीकृष्णांना अनन्यभावाने शरण जाऊन त्यांची विनम्र भक्ती करण्याची. ते स्वतः गीतेत स्पष्ट सोगतात, की केवळ मलाच शरण आल्याने मी तुमचा उद्धार करील. येथे केवळ हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मागे काय केले, हा विचार सोडून आता यापुढे भगवान श्रीकृष्णांना अनन्यभावाने शरण जाऊन जीवन सार्थकी लावण्याची खरी गरज आहे.

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..