MENU
नवीन लेखन...

ऑक्टोबर २१ – गोइंग, गोइंग, गॉन आणि उमदा उल्येट

गोइंग, गोइंग, गॉन १९४० : जेफ्री बॉयकॉटचा जन्म. त्याची प्रतिभा आणि तंत्र याबाबत कुठेही दुमत नाही पण त्याच्या अप्पलपोटेपणामुळे क्रिकेटविश्वात त्याच्याबद्दल विविध मते आढळतात. हेडिंग्लेवर एकदा मंदवेगाने (१९६७ साली भारताविरुद्ध) त्याने २४६ धावा काढल्या होत्या; पण ‘शिक्षा’ म्हणून पुढच्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले. त्याचे तंत्र अत्युत्तम होते पण चांगले चांगले फटके जाळ्यात सराव करतानाच मारावयाचे असतात असे त्याला वाटे की काय कोण जाणे (बॉयकॉटच, आणखी कोण?). स्वतःच स्वतःच्या नैसर्गिक खेळाला मुरड घालणार्‍यांमध्ये तो ‘न्यूमरो युनो’ (नंबर एक) होता. हेडींग्लेवर १९७७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत त्याने शतक करून प्रथमश्रेणीतील शतकांचे शतक पूर्ण केले. आज तो प्रख्यात दूरदृश्य समालोचक आहे. २००२ मध्ये त्याच्या घशाला कर्करोगाची लागण झाल्याचे निदान झालेले आहे पण बॉयकॉटने आपली उपजीविका बदलली नाही. आता तो चांगला ठणठणीत बरा झालेला आहे.

उमदा उल्येट १८५१ : यॉर्कशायरच्या जॉर्ज उल्येट या उमद्या अष्टपैलू खेळाडूचा जन्म. त्याची २४ ही त्या काळातील सरासरी तो काळ पाहता आजमितीच्या ४८ पेक्षा चांगली आहे. तो भेदक चेंडूबाजही होता. १८८२ मध्ये मेलबर्नमध्ये त्याने काढलेल्या १४९ धावा हे इंग्लिश माणसाचे ऑस्ट्रेलियातील पहिले शतक होते. १८८४ मध्ये लॉर्ड्‌सवर झालेल्या सामन्यात ३९.१ चौथकांमध्ये (त्या काळी षटकात चार चेंडू असत) ३८ धावा देत ७ बळी त्याने बाद केले. पराभव आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील वेळेचा अडसर त्याने फार लवकर दूर सारला. १८९० मध्ये लॉर्ड्‌सवर तो अखेरची कसोटी खेळला. ४ बाद २० वर मैदानात उतरून त्याने ७४ धावा काढल्या. शेफील्डमध्ये १८९८ साली न्यूमोनियाने त्याने निधन झाले.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..