नवीन लेखन...

डिसेंबर २१ : क्रिस श्रीकांत ऊर्फ चिका





सध्या भारतीय निवडसमितीचा अध्यक्ष असलेल्या क्रिस श्रीकांतचा जन्म २१ डिसेंबर १९५९ मध्ये चेन्नईत झाला. भारतीय संघाचे कर्णधारपदही त्याने सांभाळलेले असले तरी आक्रमक सलामीवीर अशीच त्याची खरी ख्याती आहे.
१९८१ मध्ये ‘चिका’चे एकदिवसीय पदार्पण केले, अहमदाबादमध्ये आणि नंतर कसोटीपदार्पण मुंबईत- दोन्ही इंग्लंडविरुद्ध. वयाच्या एकविसाव्या वर्षी पदार्पणच सुनील गावसकरसोबत सलामीवीर म्हणून करणे म्हणजे काय हे एकटा चिकाच जाणे ! चिकाचे तंत्र सुनील गावसकरच्या तंत्राशी कुठेही मेळ खाणारे नव्हते. सुनील गावसकर हा धीरगंभीर वास्तूरचनाकार तर श्रीकांतची फलंदाजी शिकारीसाठी मचाण बांधावे तशी वेगवान आणि काहीशी बेभरवशी ! चिकाची नजर मात्र पाहण्यासारखी होती. (निवडकर्ता म्हणून त्याची नजर कशी आहे हे येणारा विश्वचषकच सांगेल.)
गावसकर, वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ, रवी शास्त्री असे तांत्रिक अचूकता असणारे फलंदाज संघात असताना चिकाचे हे वेगळेपण अधिकच उठून दिसे.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द जसजशी पुढे निघाली तसतसे श्रीकांतला खेळपट्टीवर उभे राहण्याचे महत्त्व कळून आले आणि मग तो संघाचा एक अविभाज्य घटक बनला. १९८३ चा विश्वचषक आणि १९८५ ची बेन्सन अँड हेजेस विश्वमालिका भारताने जिंकली होती, या दोन्ही स्पर्धांमध्ये सलामीवीर म्हणून श्रीकांतची मोठी भूमिका राहिली होती.
कप्तानीदरम्यान केलेल्या काही धाडशी प्रयोगांसाठीदेखील श्रीकांत प्रसिद्ध आहे. इंग्लंडविरुद्ध विजयासाठी २६० धावांचे आव्हान असताना त्याने चेतन शर्माला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविले आणि शर्मासाब १०३ धावा काढते झाले ! सामना भारताने जिंकला. १९८९ च्या पाकिस्तान दौर्‍यातही श्रीकांतच कर्णधार होता (सचिनचा पदार्पणाचा दौरा) आणि त्यातील चारही कसोट्या अनिर्णित राहिल्या होत्या. हा मालि
ानिकाल अनेकांना सन्मान्य वाटला होता. त्याची फलंदाजी मात्र गडबडलेली होती आणि म्हणूनच त्याला संघातील स्थान गमवावे लागले. मोहम्मद अझरुद्दीनकडे यानंतर कप्तानी सोपविण्यात आली.
अझरुद्दीनच्याच आग्रहानंतर दोन वर्षांनंतर चिकाने पुनरागमन केले, एक वर्षभर तो खेळत राहिला आणि मग मात्र

तो कायमचा संघाबाहेर गेला. १९९३ मध्ये

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसंन्यास जाहीर केला.

एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिले अर्धशतक काढणारा भारतीय श्रीकांत आहे. (१२ सप्टेंबर १९८२, श्रीलंकेविरुद्ध ५७ धावा. यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये श्रीकांतने अनुक्रमे ९५ आणि ९२ धावा काढल्या होत्या.) १९८६ मध्ये त्याचे पहिले एदि शतक आले पण कपिलने त्याआधीच एदि शतक काढणारा भारतीय होण्याचा मान मिळविला होता. (कपिलच्या या पराक्रमावेळी ९९ ही श्रीकांतची एका डावातील सर्वोच्च धावसंख्या होती.)
गोलंदाजीत मात्र चिकाने बाजी मारली. एदिसामध्ये एका डावात पाच बळी मिळविणारा पहिला गोलंदाज चिकाच आहे. १० सप्टेंबर १९८८, विशाखापटणम‌च्या इंदिरा प्रियदर्शिनी मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध २७ धावांमध्ये पाच बळी.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..