अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे २१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन लातूर येथे २५ ते २७ जुलै या कालावधीत केले आहे.
लातूर येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात हे संमेलन होणार आहे. ‘माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहित्यनगरी’ असे नाव साहित्यनगरीला देण्यात आले आहे, तर संमेलनाच्या मुख्य
विचारपीठास महात्मा बसवेश्वर आणि साहित्यनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारास लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शरद गोरे, विकास पाटील उपस्थित होते.
या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन कवयित्री प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, जगदीप वनशिव, महेंद्र कांबळे, सागर काकडे, बबन डोळस यावेळी उपस्थित होते.
संमेलनाच्या बरोबरच ग्रंथदिंडी, पुरस्कार वितरण, ग्रंथ प्रकाशन, चर्चासत्र, परिसंवाद, प्रबोधन नाटिका, कविसंमेलन या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे काळभोर यांनी सांगितले.
— विवेक कांबळे
Leave a Reply