नवीन लेखन...

डिसेंबर २२ : धावा समान पण कसोटी अनिर्णित आणि दिलीप दोशी





इंग्लंडचा झिम्बाब्वे दौरा-पहिली कसोटी । हंगाम १९९६-९७
क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब, बुलावायो
१८ ते २२ डिसेंबर १९९६.
नाणेकौल झिम्बाब्वे.
प्रथम फलंदाजीचा निर्णय. सर्वबाद ३७६ आणि २३४
इंग्लंड ४०६ आणि ६ बाद २०४.
सामना अनिर्णित.
वरकरणी या कसोटीच्या गोषवार्‍यात काही जाणवणार नाही पण संघांच्या धावसंख्या पहा झिम्मी : ३७६ + २३४ = ६१०

आणि इंग्लंड (सुद्धा) ६१०. सामना मात्र अनिर्णित !! (बरोबरीत नाही.)

कसोटिहासात आजवर फक्त एकदा अशी घटना घडलेली आहे. दोन्ही संघांच्या धावसंख्या समान असूनही सामना अनिर्णित राहण्याची. आणि तो एकदा हाच वरचा.
इंग्लंड आणि झिम्बाब्वेदरम्यानची इतिहासातील ही पहिलीच कसोटी होती. दुसर्‍या डावात (म्हणजे सामन्याच्या चौथ्या डावात) इंग्लंडला विजयासाठी २०५ धावा ३७ षटकांमध्ये काढावयाच्या होत्या (उरलेल्या वेळात किमान तितकीच षटके फेकली जाणे अनिवार्य होते.) इंग्लंड काढू शकले २०४ धावा आणि त्यांचे सर्वच्या सर्व गडी बाद झालेले नसल्याने हा सामना अनिर्णित राहिला. इंग्लंड जर बरोब्बर २०४ धावांवर सर्वबाद झाले असते तर (आणि तरच) हा सामना बरोबरीत सुटला असता.
या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर नाट्य चांगलेच रंगले होते. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ३ धावा हव्या होत्या. निक नाईट आणि डॅरेन गॉफ तीन धावांसाठी पळाले होते आणि तिसरी धाव पूर्ण होण्याआधीच ‘एक’ फलंदाज बाद झालेला होता. धावफलकात गॉफच्या पुढे धावबाद अशी नोंद होती पण सामना संपल्यावर या अधिकृत धावफलकात बदल करण्यात आला आणि गॉफ नव्हे तर निक नाईट धावबाद झाला अशी नोंद करण्यात आली. धावताना उभय फलंदाजांनी एकमेकांना ओलांडलेले नसल्याने असा बदल करण्यात आला.
२२ डिसेंबर १९४७ रोजी राजकोटमध्ये दिलीप रसिकलाल दोशींचा जन्म झाला. आंतरराष्ट्रीय कारकिर्द
त ज्यांच्या प्रतिभेला उशिरा धुमारे फुटले त्यापैकी एक म्हणजे दिलीपभाई.
सप्टेंबर १९७९ मध्ये म्हणजे वयाची ३३ वर्षे पूर्ण होण्यास ३ महिन्यांचा अवधी असताना दिलीपजींनी कसोटीपदार्पण केले. पहिल्याच डावात त्यांनी १०३ धावा देत

सहा गडी बाद केले. या मालिकेत त्यांनी आणखी एकदा पाचाळी घेतली आणि संघातील त्यांचे स्थान बळकट झाले. त्यानंतर मात्र २-३ बळी सातत्याने मिळत राहूनही लक्षणीय कामगिरी करण्यात त्यांना अपयश आले.

कसोटी कारकिर्दीत एकंदरीत ३३ सामन्यांमधून त्यांनी ११४ बळी मिळविले. एका डावात पाच बळी घेण्याची कामगिरी त्यांनी सहा वेळा केली. एका सामन्यात दहा बळी घेण्याची कामगिरी मात्र त्यांना जमली नाही. पदार्पणाच्या डावात त्यांनी केलेली कामगिरी हीच त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..