नवीन लेखन...

डिसेंबर २३ : दुसरा अपेक्षित ब्रॅडमन





२३ डिसेंबर १९५७ रोजी दक्षिण आफ्रिकेतील वाँडरर्स मैदानावर ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका कसोटी सुरू झाली. यजमान संघाचा कर्णधार होता डेरिक मॅकग्ल्यू आणि पाहुण्या संघाचा कर्णधार होता इअन क्रेग. इअन क्रेगचे या दिवशी वय होते २२ वर्षे पूर्ण आणि १९४वा दिवस सुरू.
ऑस्ट्रेलियाई कसोटी संघाचे नेतृत्व करणार्‍या खेळाडूंची

वयानुसार सर्वात लहान आधी आणि मोठे-मोठे नंतर अशी यादी लावल्यास इअन क्रेग या यादीत पहिल्या स्थानी येतो.

इअन डेविड क्रेगचा जन्म १२ जून १९३५ रोजी न्यू साऊथ वेल्स प्रांतात झाला. १९५३ ते १९५८ या काळात क्रेग ऑस्ट्रेलियाकडून ११ कसोट्या खेळला. केवळ कसोटीनायक असण्याचाच नव्हे तर प्रथमश्रेणीमध्ये द्विशतक काढणारा आणि कसोटी संघात निवड झालेला सर्वात लहान ऑस्ट्रेलियाई खेळाडूही क्रेगच आहे.
क्रेग हा दुसरा ब्रॅडमन होईल अशी अनेकांची अटकळ होती आणि तिचा दबाव निश्चितपणे त्याच्यावर पडला असणारच. १९५५ च्या आसपास कांगारूंच्या संघाची कामगिरी अत्यंत खालावलेली असल्याने त्यांच्या निवडसमितीला पुनरुत्थानाचा खास कार्यक्रम बनवावा लागला. त्या कार्यक्रमाअंतर्गत इअन क्रेग कर्णधारपदी आला. खेळातील लय हरपल्याने आणि दुखापतींमुळे एक हंगामभरच क्रेग ही जबाबदारी सांभाळू शकला. त्याने जिगर दाखवीत पुनरागमन केले खरे पण वयाच्या सव्विसाव्या वर्षीच कार्यबाहुल्यामुळे त्याला क्रिकेटसंन्यास घ्यावा लागला.
प्रवासी प्रोटियांविरुद्ध नाबाद २१३ धावा काढून क्रेग प्रकाशात आला आणि तो दुसरा ब्रॅडमन होऊ शकेल अशा चर्चा सुरू झाल्या. या द्विशतकामुळे त्याची कांगारू कसोटी संघात निवड झाली- वय वर्षे १७ आणि दिवस २३९. ५३ आणि ४७ धावा ही त्याची पदार्पणाच्या कसोटीतील कामगिरी.
नंतर अ‍ॅशेस दौर्‍यासाठी त्याची निवड झाली. इंग्लंडचा दौरा करणारा तो सर्वात
हान कांगारू होता आणि त्याची-ब्रॅडमनची तुलना सतत होऊ लागली होती. या दौर्‍यात क्रेगच्या हातून काहीही नोंदनीय घडले नाही. नंतर त्याचे संघातील स्थान गेले आणि तो अभ्यासाला लागला.
१९५५-५६ च्या हंगामात त्याने

प्रथमश्रेणी पुनरागमन केले आणि अ‍ॅशेस मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळविले. ही मालिका जमेस धरून ओळीने तीन अ‍ॅशेस मालिका कांगारू हरले होते. मायदेशी परतल्यावर कर्ण-उपकर्ण-धार पायउतार झाले आणि क्रेगकडे नेतृत्व आले. पहिल्याच मालिकेत (उपरोल्लेखित) त्याच्या नेतृत्वाखालील संघाने ३-० असे निर्भेळ यश मिळवले. फलंदाज म्हणून मात्र क्रेग निष्प्रभ ठरला. कर्णधारपदाचा दबाव म्हणून की काय पूर्वी निर्व्यसनी असलेल्या क्रेगला आता धूम्रपानाची सवय लागली. भरीस भर त्याला १९५८-५९ च्या हंगामात यकृतशोथ (हेपटाइटिस) झाला आणि क्रिकेटच्या मैदानापासून तो दूर गेला.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..