ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा नाताळाचा अर्थात ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे, ख्राईस्ट मास. याचा अर्थ, येशूच्या (ख्रिस्त) जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहीक प्रार्थना. पण नाताळ केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षोल्हासाने साजरा केला जातो. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षो उल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात पंचवीस डिसेंबरला सूर्यदेव डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोककल्याणासाठी या पृथ्वीवर आला होता. म्हणूनच प्रार्थना, ख्रिसमस गीत कॅरोल्सचे गायन, शुभेच्छा पत्रांचे आदानप्रदान, विविध खाद्यपदार्थ या द्वारे येशूचा जन्मोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. २४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांचा गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. रोट व पवित्र मद्याचा प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात. सध्या साजरा केला जातो तशा पद्धतीचा ख्रिसमस १९ व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमसमध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. या दिवशी आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६ मध्ये ख्रिसमर्स कार्ड बनविले गेले. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८ मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो. २५ डिसेंबर हा दिवस दोन गोष्टींशिवाय अपूर्ण असतो. सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक. ड्रायफ्रूट्स रममध्ये घालतात आणि ख्रिसमसच्या दिवशी हा मुरलेला मेवा केकच्या मिश्रणात घालतात. हा खास ख्रिसमस केक असतो. याशिवाय इतरही केकचे प्रकार असतातच. बेल्जियम, जर्मनी, फिनलंड या देशांत नाताळसाठी खास बिअर बनवली जाते, तर नॉर्डिक देशात “ग्लोग’ हे पारंपरिक ख्रिसमस ड्रिंक बनवले जाते. रेड वाईनमध्ये थोडा संत्र्याचा रस व लवंग, दालचिनी, सुंठ आणि वेलदोडा असे मसाले घालून ग्लोग बनवले जाते. इस्टर्न युरोपमध्ये नाताळच्या जेवणासाठी बारा पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. याचे कारण म्हणजे बारा हा आकडा श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो तसेच तो आकडा वर्षाच्या सगळ्या महिन्याचे प्रतिनिधित्व करतो. हे जेवण संपूर्ण शाकाहारी असून त्यात पारंपरिक पद्धतीनुसार व त्या सीझनमध्ये मिळणारी फळे व भाज्या वापरून बनवलेले पदार्थ असतात. त्यामध्ये बीटचे सूप, भाज्या भरलेले डंपलिंग्ज, खसखस घातलेली केक, जिंजर ब्रेड, कोबीचे रोल्स, हे पदार्थ प्रामुख्याने असतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
ख्रिसमससाठी काही खास पदार्थ
ख्रिसमस केक
ब्लॅक फॉरेस्ट केक
ख्रिसमस जिंजर कुकी
खजूर आणि अक्रोडाच्या कुकीज्
हनी बनाना ब्रेड
सोया नानकटाई
कॉर्न नानकटाई
रम केक
पोटॅटो ब्रेड
पायनापल पेस्ट्री (बिना अंडय़ाची)
Leave a Reply