१९८६ : वेस्ट इंडीजची मधली फळी मजबूत असतानाही आश्चर्यकारकरीत्या ती कोसळल्याने पाकिस्तान फैसलाबाद कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. विंडीजचेच वर्चस्व राहिलेल्या या कसोटीट विंडीजला विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य मिळाले होते. ९ बाद ४३ वर दिवसाचा खेळ संपला आणि पुढच्या सकाळी आणखी १० धावांच्या भरीनंतर विंडीज संघाच्या तोवरच्या न्यूनतम धावसंख्येवर हा डाव संपला. आजही पाकी भूमीवरील ही नीचतम धावसंख्या आहे. १९८० च्या दशकात वेस्ट इंडीज संघाने (८२ सामन्यांमधून) मावलेल्या आठ दुर्मिळ सामन्यांपैकी हा एक होय. या आठही सामन्यांमध्ये फिरकीचा मोठा वाटा राहिला. बॉब हॉलंड, नरेंद्र हिरवानी आणि अलन बॉर्डरचे कौतुक करणारांनी खास वाचाचे : अब्दुल कादिरने या सामन्यात दुसर्याडावात १६ धावांमध्ये ६ बळी मिळविले.
१९९४ : सामन्यांच्या शतकानंतर पहिले शतक आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी सलामीवीराकडून शतक अशी दुर्मिळ घटना. आपल्या कारकिर्दीतील १०३ व्या सामन्यात न्यूझीलंडच्या केन रुदरफोर्डने पहिले शतक पूर्ण केले. ४ बाद २६९ अशी धावसंख्या त्याने न्यूझीलंडला उभारून दिली. शतकानंतर आलेले हे काही पहिलेच शतक नव्हते. भारताच्या डावाची सुरुवात सचिन तेंडुलकर आणि मनोज प्रभाकरने केली. १४४ धावांची सलामी त्यांनी दिली. सचिन तेंडुलकरने धावांचे शतक पूर्ण केले. भारताने हा सामना ११ चेंडू राखून जिंकला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply