नवीन लेखन...

ऑक्टोबर २९ – जिवंत झालेले क्रिकेट आणि दारुण पराभव

१८७७ : विख्यात क्रिकेटलेखक नेविल कार्डसने ज्याचा ‘मूर्त रुपातील यॉर्कशायर क्रिकेट’ म्हणून गौरव केला होता त्या विल्फ्रेड र्‍होड्सचा जन्म. र्‍होड्स निर्विवादपणे इंग्लंडचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ठरतो. अकराव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून त्याने कारकिर्दीची सुरुवात केली आणि अखेर सलामीवीर बनला ! त्याच्या गोलंदाजीत उंचीचे एवढे वैविध्य होते की व्हिक्टर ट्रम्परने त्याला एकदा ‘मला मिनिटभराची तरी विश्रांती मिळू दे’ असे म्हटल्याचे सांगतात. व्हिक्टर ट्रम्पर हा ऑस्ट्रेलियाच्या सार्वकालिक महान फलंदाजांपैकी एक मानला जातो. र्‍होड्स हा कसोटी खेळणारा सर्वात वृद्ध खेळाडू आहे. १९२९-३० च्या हंगामात वेस्ट इंडीजमध्ये ५२ वर्षे १६५ दिवस एवढ्या कमी वयात तो कसोटी खेळला. ३० वर्षांहून अधिक काळाची कसोटी कारकीर्द असणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याने विक्रमी १६.७१ च्या सरासरीने विक्रमी ४,१८७ बळी मिळविले. (प्रथमश्रेणी) १९१२ मध्ये जॅक हॉब्जच्या साथीत त्याने धावेगणिक हॉब्जची बरोबरी करीत इंग्लंडला रक्षा मालिकेतील सर्वोत्तम ३२३ धावांची सलामी मिळवून दिली. उत्तरकाळात डोळ्यांनी त्याला साथ दिली नाही. डॉर्सेटमध्ये १९७३ साली त्याचे निधन झाले.

दो दिन का इंतजार खत्म…

२००० : तोवरच्या इतिहासातील सर्वात मोठा एकदिवसीय विजय आणि अर्थातच सर्वात दारुण पराभवही. चॅम्पिअन्स चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने –चा तब्बल २४५ धावांनी पराभव केला. सनथ जयसुरियाने १६१ चेंडूंमध्ये २१ चौकार आणि ४ हवाई फटकारांच्या मदतीने १८९ धावा चोपल्या. व्हिव रिचर्ड्‌ससह जयसुरिया एदिसांमध्ये सर्वाधिक धावांची खेळी करणारा दुसर्‍या क्रमांकाचा फलंदाज ठरला. –च्या वेंकटेश प्रसादने दानशूरत्वाची हद्द करीत फक्त ७ षटकांमधून ७३ धावा फुलविल्या. ३०० धावांच्या आव्हानासमोर –चा डाव ५४ धावांमध्ये संपला. –चा हा सर्वात ‘नीच’तम डाव होता. फक्त रॉबिनसिंगच दुहेरी आकडे गाठू शकला. चमिंडा वास १४ धावांमध्ये ५ बळी.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..