दिनांक : २ जानेवारी १९७९. (सामन्याचा चौथा दिवस)
स्थळ : ईडन गार्डन्स, कलकत्ता.
सामना : भारत वि. वेस्ट इंडीज. १९७८-७९ च्या हंगामातील तिसरी कसोटी.
मानकरी : सुनील गावसकर (भारतीय कर्णधार).
पराक्रम : कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक काढण्याची कामगिरी तिसर्यांदा केली !
धावसंख्या : भारत ३०० (गावसकर १०७, कपिल देव ६१) आणि १ बाद ३६१ घोषित (गावसकर नाबाद १८२, दिलीप वेंगसरकर नाबाद १५७).
वेस्ट इंडीज : ३२७ आणि ९ बाद १९७.
सामना अनिर्णित.
अभेद्य बचावतंत्र आणि अढळ संयमासाठी प्रसिद्ध असलेल्या सुनील गावसकरने या तारखेपूर्वी कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतके काढण्याची कामगिरी दोनदा केलेली होती.
१. एप्रिल १९७१. वेस्ट इंडीजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये १२४ आणि २२० धावा.
२. नोव्हेंबर १९७८. पाकिस्तानविरुद्ध कराचीत १११ आणि १३७ धावा.
३. उपरोल्लेखित.
कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतके रचण्याची कामगिरी कारकिर्दीत दोनदा करणारे खेळिये असे :
१. हर्बर्ट सटक्लिफ (इंग्लंड)
२. क्लाईड वॉलकॉट (विंडीज)
३. ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया)
४. अॅलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
५. मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)
६. अरविंद डिसिल्वा (श्रीलंका)
७. रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया)
८. राहुल द्रविड (भारत)
सर डॉन ब्रॅडमन यांना ही किमया एकदाच साधली तर लिटल मास्टर सचिन तेंडुलकरला अद्याप ती साधलेली नाही (गावसकर हे सलामीवीर आणि ब्रॅडमन वन-डाऊन पझिशनला खेळणारे असल्याचा दोघांनाही फायदा झाला. सचिनचे फलंदाजीच्या क्रमवारीतील चौथे स्थान हाच अशा विक्रमासाठीचा मोठा अडथळा आहे.)
नऊ धुरंधरांच्या शतकी डावांचे एक विश्लेषण :
१. सचिन तेंडुलकर : २८८ डावांमधून ५० शतके. अर्थात दर ५.७६ डावांमागे एक
शतक.
२. रिकी पॉन्टिंग :
२५९ डावांमधून ३९ शतके. अर्थात दर ६.६४ डावांमागे एक शतक.
३. जॅक कॅलिस : २४४ डावांमधून ३८ शतके. अर्थात दर ६.४२ डावांमागे एक शतक.
४. सुनील गावसकर : २१४ डावांमधून ३४ शतके. अर्थात दर ६.२९ डावांमागे एक शतक.
५. ब्रायन लारा : २३२ डावांमधून ३४ शतके. अर्थात दर ६.८२ डावांमागे एक शतक.
६. स्टीव वॉ : २६० डावांमधून ३२ शतके. अर्थात दर ८.१२५ डावांमागे एक शतक.
७. राहुल द्रविड : २५९ डावांमधून ३१ शतके. अर्थात दर ८.३५ डावांमागे एक शतक.
८. मॅथ्यू हेडन : १८४ डावांमधून ३० शतके. अर्थात दर ६.१३ डावांमागे एक शतक.
९. डॉन ब्रॅडमन : ०८० डावांमधून २९ शतके. अर्थात दर २.७५ डावांमागे एक शतक.
या शतकवीरांपैकी सचिन, ब्रॅडमन आणि हेडन यांना वगळता सुनील गावसकरचे (अपवाद खरे तर फक्त ब्रॅडमनचाच कारण सचिन-हेडनच्या काळात अधिकाधिक कसोट्या खेळल्या जाताहेत) डाव : शतक गुणोत्तर इतरांपेक्षा उजवे आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply