नवीन लेखन...

नोव्हेंबर ०४ – मस्तवाल रॉडनी मार्श आणि पदार्पणातच कर्णधार

मस्तवाल रॉडनी मार्श १९४७ : ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा एक उत्तम मासला असलेल्या रॉड मार्शचा जन्म. तडजोड न करणारा, आक्रमक, मस्तवाल रॉडनी मार्श हा खेळातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक आहे. त्याच्या कहानीचा प्रारंभ चांगला नव्हता. उत्तरोत्तर त्याने प्रगती केली. ‘झेल मार्श गोलंदाज लिली’ हा शबदसमूह कसोटी धावपुस्तिकांमध्ये तब्बल ९५ वेळा येतो; इतिहासातील इतर कोणत्याही दुकलीपेक्षा जास्त. मार्श हा कसोटी शतक काढणारा पहिला ऑसी रक्षक आहे. सातव्या क्रमांकावर येऊन तो चेंडू तडकाविण्याचा प्रयत्न करी. १९७६-७७ च्या शतकमहोत्सवी कसोटीत मेलबर्नमध्ये त्याने ११० धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाच्या एका यशस्वी क्रिकेट अकादमीचा तो संचालक बनला आणि नंतर नव्याने बनलेल्या इंग्लिश अकादमीची जबाबदारी त्याच्याकडे आली. तो इंग्लंडचा निवडकर्ताही बनला. सप्टेंबर २००५ मध्ये इंग्लंडला रक्षा मिळवून दिल्यानंतर त्याने या दोन्ही जबाबदार्‍या सोडल्या.

पदार्पणातच कर्णधार १९६८ : पदार्पणातच देशाचे नेतृत्व करावयास लागणे ही झोप लागू न देणारी जबाबदारी आहे पण आज जन्मलेल्या ली जर्मोनला पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंडचे नेतृत्व करावे लागले. सामना होता भारताविरुद्ध बंगलोरमध्ये. ४८ आणि ४१ धावा करीत दोन्ही डावांमध्ये तो पाहुण्या फलंदाजांमध्ये अग्रस्थानी राहिला. किवींनी हा सामना ८ गड्यांनी गमावला. त्याच्या नेतृत्वाखालील मेंगळट संघाने १२ सामन्यांपैकी एकच सामना जिंकला. १९९६-९७ मध्ये घरच्या मैदानांवर इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर स्टीफम फ्लेमिंगला म्होरक्या बनविण्यात आले.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..